Onion News | देवळा येथील ‘या’ कृषी बाजारसमितीत कांदा लिलावाचा होणार शुभारंभ


Onion News | सोमनाथ जगताप – देवळा | देवळा येथे उद्या बुधवार रोजी सुनील आहेर खाजगी कृषी मार्केट मध्ये भव्य कांदा लिलाव शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती संचालक मंडळाने दिली आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आपला शेतमाल विक्रीसाठी खाजगी बाजार पेठ खुली करून दिल्याने शेतकरी आपला सर्व कृषीमाल पाहिजे त्या खाजगी मार्केटमध्ये विकू लागला आहे.

Onion News | उद्या कांदा विक्रीचा भव्य शुभारंभ

वाढत्या स्पर्धेमुळे शेतकऱ्यांना उत्पादित मालाला योग्य भाव आणि जागेवर रोख रक्कम मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल देखील आता खाजगी बाजार समित्यांकडे वाढला आहे. त्यानुसार, देवळा येथे मालेगांव रोडवरील सुनील आहेर खाजगी कृषी मार्केटची स्थापना करण्यात आली असून, उद्या बुधवार रोजी सकाळी ११ वाजता या मार्केटमध्ये कांदा विक्रीचा भव्य शुभारंभ आयोजित करण्यात आला आहे.

सुनील आहेर खाजगी कृषी मार्केट या ठिकाणी शेतकऱ्यांना गुणवत्तेनुसार उच्च बाजार भाव मिळणार असून, लिलावासाठी प्रशस्त आवार उपलब्ध करून देण्यात आले आहे. या ठिकाणी माल घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अनुभवी व्यापारी वर्ग असणार आहे. तसेच या मार्केटमध्ये शेतकऱ्यांना रोख पेमेंट मिळणार असून, या मार्केटचे संपूर्ण कामकाज संगणकीयकृत आहे. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा तसेच कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन मार्केटचे अध्यक्ष सुनील आहेर आणि संचालक मंडळाने केले आहे.