Onion News | सरकारला तुमच्या कष्टाची जाण नसेल तर…; पवारांचा हल्लाबोल


Onion News | कांदा निर्यातबंदी विरोधात शरद पवार हे मैदानात उतरलेले आहेत. आज (दि. 11) ते चांदवड मधील मुख्य चौकात बोलत होते. यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. कांदा निर्यातबंदीच्या विरोधात चांदवड मध्ये आज राष्ट्रवादीचे आंदोलन पार पडले. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार स्वतः उपस्थित होते. यावेळी शरद पवार हे बोलत होते.

कांद्याचे उत्पादन हे महाराष्ट्रातील नाशिकमध्ये जास्त होत असते. याशिवाय साखरेचे सिरप घेऊन इथेनॉल नावाचे प्रोडक्ट बनवतो त्यावर सुद्धा बंदी घातली. याची जबरदस्त किंमत उत्पादकांना मोजावी लागेल. द्राक्ष तयार झाल्यानंतर गारपीट झाली म्हणून द्राक्षाचा मणी तुटला त्यामुळे त्याला किंमत मिळू शकत नाही. त्यामुळे द्राक्ष बागायतदार अडचणीत सापडला आहे. सरकारने यांना मदत दिली पाहिजे तसेच मार्ग काढला पाहिजे.

यावेळी नाफेड बद्दल बोलताना शरद पवार म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दोन पैसे मिळावे हे धोरण नाफेडचे असते पण ते प्रत्यक्षात बाजारात होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना काही फायदा होत नाही. तसेच सबसिडी द्यायची वेळ आली तर सरकारने विचार केला पाहिजे. कांद्याचे भाव घसरले तेव्हा समितीने विचार करायला हवा. दिल्लीत अशा वास्तवाचा विचार केला जात नाही.

370 आणि निवडणूका बाबतीत शरद पवार म्हणाले की, माझ्या वाचनात अजून काही आलेले नाही. शेतीच्या नकाशावरील अत्यंत महत्वाचा जिल्हा म्हणजे नाशिक आहे. द्राक्ष आणि कांद्याचे उत्पादन घेण्यात नाशिक या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नोंद होत असते. कांदा हे असे पीक ज्यात दोन पैसे मिळतात आणि त्यासाठी तुम्ही कष्ट करतात पण दुर्दैवाने ज्यांच्या हातात देशाचे धोरण ठरविण्याचे अधिकार आहे त्यांना तुमच्या बद्दल कसलीच भावना नाही. त्यांना तुमच्या कष्टाची जाण नसेल तर त्यांचा उपयोग नाही. कांद्याच्या बाबतीत केंद्राने जो निर्णय घेतला त्यामुळे किमती कोसळल्या आहेत.

मागेही एकदा असेच झाले तेव्हा मी सगळं सोडून दिल्लीत गेलो होती आणि त्यावेळी काही लोकांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालून भाजपचे लोक आले. कांदा पिकवणारा शेतकरी लहान आहे. त्याला कधीतरी दोन पैसे मिळतात त्यामुळे दंगा करायचे कारण नाही. कांद्याचा जेवणात वापर केला तर खर्च किती येतो हे मी विचारलं आहे असं म्हणत शरद पवार यांनी केंद्र सरकारवर सडकून टिका केला आहे.