Onion Issue | कांद्यासाठी आज शरद पवार नाशकात; चांदवडमध्ये जोरदार बॅनरबाजी


Onion Issue | सध्या नाशिक जिल्ह्यात कांदा प्रश्न चांगलाच पेटलेला दिसुन येत आहे. नुकतंच केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केलेली असल्याने नाशिकमधील शेतकरी संतापलेले आहेत. यातच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्वत: रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर शरद पवार चांगलेच सक्रीय झाल्याचं दिसुन येत आहे. आता कांदा प्रश्नावर आंदोलनासाठी शरद पवार हे स्वत: रस्त्यावर उतरणार असताना यामुळे नाशिकमध्ये बॅनर झळकताना दिसत आहे. ‘महाराष्ट्राचा 83 वर्षांचा तरुण योद्धा’ या आशयाच्या बॅनरमधून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संदेश दिलेला आहे.

नुकतीच केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केली असताना शेतकरी आक्रमक झालेले आहेत. यामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्वत: रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आज सोमवारी (दि. ११) चांदवड येथील शेतकरी आंदोलनात ते सहभागी होणार आहेत. शरद पवार यांच्या गटाकडून नाशकात शक्ती प्रदर्शन करण्याचा हा प्रयत्न आहे. केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदी विरोधात हे आंदोलन करण्यात येणार असून चांदवड येथे महामार्गावर सकाळी ११ वाजता म्हणजे अगदी थोड्याच वेळात हे ‘रास्ता रोको’ आंदोलन सुरु होणार आहे.

शुक्रवारपासून कांदा निर्यातबंदीविरोधात नाशिकमधील बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद होते. आता लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमद्ये कांदा लिलाव सुरु होणार आहेत. लिलाव बंदमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान होत आहे. चांदवड येथे आज (दि. 11) डिसेंबर रोजी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत केंद्र सरकार विरोधात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग रास्ता-रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मा. आमदार उत्तम भालेराव आणि तालुका प्रमुख सयाजी गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत दिली होती.