Good News | गेल्या पाच वर्षांत दूध, अंडी, मांस उत्पादनात लक्षणीय वाढ


Good News | नवी दिल्ली | गेल्या पाच वर्षांमध्ये 2022-23 मध्ये दूध, अंडी आणि मांसाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असून जरी त्याच कालावधीत लोकरीच्या उत्पादनात नकारात्मक वाढ झाली आहे असे केंद्रीय मत्स्यपालन, प्राणी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार रविवारी (दि. १०)ही माहिती समोर आलेली आहे.

गुवाहाटी येथील राष्ट्रीय दूध दिनाच्या कार्यक्रमात जारी करण्यात आलेला मूलभूत पशुसंवर्धन सांख्यिकी 2023 अहवालानुसार, मार्च 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान गोळा केलेल्या पशु एकात्मिक नमुना सर्वेक्षणाच्या परिणामांवर आधारित आहे. हे सर्वेक्षण देशभरात तीन हंगामात केले जाते: उन्हाळा (मार्च-जून), मान्सून (जुलै-ऑक्टोबर) आणि हिवाळा (नोव्हेंबर-फेब्रुवारी).

या अहवालानुसार, भारताचे दूध उत्पादन 2022-23 मध्ये 3.8% वाढून 230.58 दशलक्ष टन (mt) वर पोहोचले असून त्यात कोणत्या राज्याचा किती वाटा आहे ते पाहुयात- उत्तर प्रदेशचा वाटा सर्वाधिक 15.7% आहे, त्यानंतर राजस्थान (14.44%), मध्य प्रदेश (8.73%), गुजरात (7.49%) आणि आंध्र प्रदेश (6.70%). सर्वाधिक वार्षिक वाढीचा दर कर्नाटक (8.76%) त्यानंतर पश्चिम बंगाल (8.65%) आणि उत्तर प्रदेश (6.99%) मध्ये नोंदवला गेला आहे.

अंडी उत्पादनात वार्षिक 6.7% वाढ होऊन ते 138.38 अब्ज झाले तर मांसाचे उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत 5% वाढून 2022-23 मध्ये 9.77 दशलक्ष टन झाले. रुपाला यांनी आंध्र प्रदेशचा 20.1% वाटा असलेला प्रमुख अंडी उत्पादक देश म्हणून नोंद केली आणि त्यानंतर तामिळनाडू (15.58 %), तेलंगणा (12.77 %), पश्चिम बंगाल (9.94%) आणि कर्नाटक (6.51%) आहे. वार्षिक वाढीच्या बाबतीत, पश्चिम बंगाल (20.1%), सिक्कीम (18.93%) आणि उत्तर प्रदेश (12.80%) यांनी सर्वाधिक दर नोंदवलेले आहेत.

मांस उत्पादनाच्या बाबतीत उत्तर प्रदेश देशाच्या एकूण उत्पादनापैकी 12.2% आहे, त्यानंतर पश्चिम बंगाल (11.9%), महाराष्ट्र (11.5%), आंध्र प्रदेश (11.2%) आणि तेलंगणा (11%), तर सर्वाधिक आहे. सिक्कीम (63%), मेघालय (38.34%) आणि गोवा (22.98%) यांनी वार्षिक वाढ नोंदवली आहे.