Onion News | कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत केंद्र सरकारच्या धरसोडीच्या धोरणाचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला. जेव्हा शेतकऱ्यांकडे कांदा होता. तेव्हा कांद्याला भाव नव्हता आणि आता भाव आहे. तर, अगदी काहीच भागांतील शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी नाफेडच्या अध्यक्षांनी नाशिकमधील कांदा खरेदी केंद्रावर अचानक भेट दिली असता, तिथे गैरव्यवहार उघडकीस आला होता. या घटनेविरोधात कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले होते.
याबाबतीत राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना पत्रकारांनी प्रश्न केला असता, या कांदा खरेदीच्या घोटाळ्यावरून त्यांनी शेतकऱ्यांना बेजबाबदार सल्ला दिला आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले असून, राज्याच्या कृषीमंत्र्यांच्या या व्यक्तव्यावरून संताप व्यक्त केला जात आहे. तर धनंजय मुंडे यांनी त्यांचे हे वक्तव्य मागे घ्यावे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांची माफी मागावी, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.(Onion News)
अध्यक्ष म्हणतात गैरव्यवहार झाला; संचालक म्हणतात नाही झाला..?
नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला जातो. मात्र नाफेडचे अध्यक्ष जेठाभाई अहिर यांनी नाशिकमधील विविध कांदा खरेदी केंद्रांवर अचानक भेटी दिल्या असता, येथे गैरव्यवहार उघडकिस आला होता. प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून नाहीतर बाजार समितीतूनच कांदा खरेदी होत असल्याचे यावेळी निदर्शनास आले होते. केंद्रांवर नियमबाह्य पद्धतीने कामकाज होत असल्याचेही ते म्हणाले होते. मात्र, नाफेडचे संचालक अशोक ठाकूर यांनी आरोप फेटाळून लावले असून, गैरव्यवहार झाला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.(Onion News)
Onion News | नाफेड आणि एनसीसीएफच्या कांद्याचे दर आता वाणिज्य मंत्रालय ठरवणार..?
Onion News | कांदा खरेदीत घोटाळा होत असेल तर कोर्टात जा
यानंतर कांदा खरेदीतील या घोटाळ्यावरुन शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. याबाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना पत्रकारांनी प्रश्न केला असता, “कांदा खरेदीत घोटाळा होत असेल तर तुम्ही कोर्टात जा”, असा सल्ला देत बेजबाबदार वक्तव्य केले. मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर कांदा उत्पादक शेतकरी नाराज असून, नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी थेट मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. जर राज्याचे कृषिमंत्रीच अशी बेजबाबदारीची भाषा करत असतील. तर ही नक्कीच खेदाची बाब असल्याचे राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे हे म्हणाले.
Nashik Onion News | कर्नाटकच्या कांद्याला वेगळा न्याय; नाशिकमध्ये शेतकरी संतप्त, लिलाव बंद
कृषीमंत्र्यांना शेतकऱ्यांबाबत किती आस्था हे दिसले
एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की, आमचे सरकार हे सर्वसामान्यांचे आणि शेतकऱ्यांचे सरकार आहे आणि दुसरीकडे त्यांच्याच सरकारमधील कृषीमंत्री अशी वक्तव्यं करत असतील. तर, शेतकऱ्यांनी न्यायची अपेक्षा कोणाकडून ठेवायची..? असा संतप्त प्रश्न शेतकऱ्यांनी केला आहे. कृषीमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत किती आस्था आहे. हेच यामुळे समोर आले असून, कृषिमंत्र्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची माफी मागावी आणि याप्रकरणी त्यांच्या राजीनाम्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.