Onion Breaking | विंचूर बाजारसमितीत शेतकऱ्यांनी केले कांदा लिलाव बंद!


Onion Breaking | सध्या नाशिक जिल्ह्यासह संपुर्ण महाराष्ट्रात कांदा निर्यातबंदी हा मुद्दा जोरदार पेटला असताना काही नेत्यांनी याबाबत आवाजही उठवला मात्र या सगळ्याचा काही उपयोग झाला नसल्याचं चित्र सध्या स्पष्ट होत आहे. 7 डिसेंबर 2023 पासून केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लागू केली आणि या बंदीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी वारंवार कांदा निर्यातबंदी मागे घेण्याची मागणीही केली.

Onion Breaking | नेमकं घडलं काय ?

आता एक मोठी बातमी समोर येत असून नाशिकमधील एक मुख्य बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या विंचूर बाजारसमितीत शेतकऱ्यांनी कांद्याचे दर घसरल्यामुळे बाजारसमितीतील कांदा लिलाव बंद पाडले आहेत. कांद्याच्या दरात कांदा निर्यातबंदी केल्यापासून मोठ्या प्रमाणात घसरण होत असताना य़ाचा मोठ्या प्रमाणात फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत होता आता याच्याच निषेधार्थ नाशिकमधील एक मुख्य बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या विंचूर बाजारसमितीत शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडल्याची माहिती समोर येत आहेत. यावेळी शेतकरी कांदा प्रश्नी आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान हा कांदा लिलाव पुर्ववत करण्यात आला असून काही काळासाठी हा कांदा लिलाव बंद करण्यात आला होता. एका शेतकऱ्याचा कांदा खराब असल्याने त्याच्या कांद्याला कमी दर मिळत होता म्हणुन सदर शेतकरी नाराज होत त्यांनी हा कांदा लिलाव काही काळासाठी बंद पाडला होता मात्र आता विंचूर बाजारसमितीत कांदा लिलाव पुर्ववत करण्यात आला आहे. तर कांद्याला प्रतिक्विंटल १२००-१५०० असा दर मिळत आहे. कांदा निर्यातबंदीमुळे मात्र कांद्याला फार मोठा फटका बसला आहे हे खरं! – सुरेश विखे (विंचूर बाजारसमिती)