Property News | नाशकातील घरांना मागणी; मनपाच्या तिजोरीत भर


Property News | महाराष्ट्रातल्या शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक हे एक महत्त्वाचे केंद्र झालेले असताना नाशिक हे मुंबई-पुणे या शहरांबरोबरच महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर होत आहे. तसेच भारतातील वेगाने विकसत असलेल्या शहरांपैकी नाशिक हे एक शहर आहे. यातच सध्या नाशिक शहरात वास्तव्यास येण्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचं दिसून येत आहे.

नाशिकमधील हवामान हे मुंबई-पुणे शहरातील लोकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करत असून सध्या नाशकात वास्तव्यास राहण्यासाठी इतर शहरातील लोकांची पसंती असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. दरम्यान, नाशकात मागील आठ महिन्यांच्या काळात 61 हजार 601 मालमत्तांची खरेदी-विक्री झाली आहे.

Property News | नाशिक शहरात ८ महिन्यात घरखरेदीत १५.८% वाढ

नाशिक शहरातील मालमत्तांची खरेदी-विक्री ही 2022 या वर्षाच्या तुलनेत 8 हजार 409 ने वाढली असून या माध्यमातून 2022 पेक्षा तब्बल 158 कोटी जास्तीचा महसूल हा शासनाला मिळाला आहे. नाशिकमधील वाढतं आधुनिकीकरण पाहता आता शहरात 120 मीटर उंचीपर्यंतच्या बांधकामांना परवानगी मिळाली असल्याने शहरात आता हायराइज टॉवर उभारण्यात येत आहेत.

शहरातील वाढतं आधुनिकीकरण यामुळे शहरात उंच इमारतींमधील उच्च श्रेणींच्या घरांना मागणी वाढताना दिसत असून एकूण घरखरेदीत ७० टक्के मागणी ही ५० लाख रुपयांपर्यंतच्या घरांना असल्याचे क्रेडाई नाशिक मेट्रो या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेकडून स्पष्ट आले आहे.

नाशिक शहरात सध्या शैक्षणिक संस्था वाढत असून यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वर्ग नाशिक शहरात येत आहे. तसेच नाशिक शहरातील वातावरण हे इतर शहरांपेक्षा स्वच्छ आणि शूद्ध असल्याने मुंबई-पुण्यातील लोक नाशकात स्थलांतरीत होत आहेत. या सर्व बाबी पाहता नाशिकमधील बांधकांंमाना मोठ्या प्रमाणात मागणी वाढते आहे. शहरातील मालमत्तांच्या वाढत्या मागणीने नाशिक महानगरपालिका महसुलात १५८ कोटींची भर पडलेली आहे. यामुळे नाशकातील अर्थव्यवस्थेला चालना मिळते आहे. – शांतनू देशपांडे, NAREDCO Secretary