Cotton News | देशात यंदा कापूस उत्पादन होणार कमी


Cotton News | यंदा राज्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडले असून यंदा झालेल्या अत्यल्प पावसाने राज्याच्या अनेक भागांत दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्यातच ऐन पावसाळ्याच्या काळात एक मोठा ड्राय स्पेल गेला. तसेच याचा परिणाम मोठ्या प्रमाणात राज्यातील शेतीवर होत असून सध्या अनेक शेतीपिकांचा भाव तेजीत जाताना दिसत आहे. 

तांदुळ, लसून तसेच भाजीपाला या उत्पादनांची आवक सध्या बाजारात कमी झाल्याने या उत्पादनांना चांगलाच बाजारभाव मिळत असून त्याबरोबरच यंदा राज्यातील कापूस उत्पादन 8 टक्क्यांनी घसरले आहे. ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या कापसाच्या नव्या हंगामात 295 लाख कापूस उत्पादनाचा अंदाज ‘CAI’ने व्यक्त केला असून एक कापूस गाठ 170 किलो रुईची असते तर मागील हंगामातील शिल्लक साठा जवळपास 29 लाख गाठींचा आहे.

Cotton News | यंदा कापूस उत्पादनात घट होण्याची शक्यता

यंदा महाराष्ट्रासह मध्य भारतातील गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये 175.65 लाख कापूस गाठींचे उत्पादन होण्याची शक्यता असून या तीन राज्यांमध्ये गेल्या हंगामात 190.67 लाख कापूस गाठींचे उत्पादन झाले असल्याने खराब वातावरणाने या राज्यांत कपाशीच्या पिक उत्पादनावर मोठा परिणाम झाला.

CAI’च्या अहवालानुसार, महाष्ट्रात 2023-24 या हंगामात 75.14 लाख कापूस गाठींचे उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून मागील 2022-23 च्या हंगामात महाराष्ट्रात 79.85 लाख कापूस गाठींचे उत्पादन घेण्यात आले होते यावरून असे स्पष्ट होतं की, यंदा कापूस उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.