Malegaon | सध्या महाराष्ठ्राच्या अनेक भागात दुष्काळाचं सावट दिसून येत असताना डिसेंबर महिन्यातच नाशिक जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यातील काही भागात ट्रॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ ओढावलेली आहे. त्यातच जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपुर्वी शेतकऱ्यांवर एकाचवेळी सुलतानी आणि आस्मानी संकट कोसळलं असून खरीप हंगाम पूर्ण वाया गेला होता आता त्यातच पाण्याअभावी रब्बीचा हंगामदेखील धोक्यात आहे.
बुधवारी (दि. १३) सकाळी चार सदस्यीय केंद्रीय दुष्काळ निवारण पथक मालेगावात दाखल झाले आणि या पथकाने सौंदाणे गावापासून पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी सुरूवात केली. थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन समितीचे प्रमुख प्रियरंजन आणि चिराग भाटिया यांनी शेतातील वाळलेल्या मका, बाजरी, कपाशी, डाळिंबदागांची पाहणी केली आणि यानंतर सौंदाणे ग्रामपंचायत कार्यालयात काही शेतकऱ्यांशी चर्चा करून या शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या.(Malegaon)
राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील निर्माण झालेल्या दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक महाराष्ट्रात दाखल झाले असून केंद्रीय कृषी मंत्रालयाचे 12 सदस्यांचे पथक राज्यातील दुष्काळ आणि खरीप नुकसानीचा आढावा घेण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्याचा दौरा करत आहेत. पिक लागवड खर्च, उत्पादनाच्या नुकसानीची माहिती यावेळी केंद्रीय पथकाकडून घेण्यात आली आहे.
दुष्काळाने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असताना केंद्राने कांदा निर्यातबंदी करून शेतकऱ्यांना आतोनात नुकसानीला भाग पाडल्याचा आरोप काही शेतकयांनी केला आहे. “साहेब, दुष्काळाने होरपळलो आहोत…. आता कांदा निर्यातबंदीने पुरते उद्ध्वस्त झालो त्यातच पुन्हा उभं राहण्यासाठी शासनाच्या मदतीचा आधार उरल्याची” व्यथा मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाहणी दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय दुष्काळ पथकासमोर तालुक्यातील शेतकऱ्याचं गंभीर वास्तव समोर आणलेलं आहे.
Malegaon News
दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आलेले तालुके म्हणून मालेगाव, येवला आणि सिन्नर यांची घोषणा झाली असताना बुधवारी(दि. १३) केंद्रीय समितीने मालेगाव तालुक्यातील शेतीची पाहणी केली. प्रातिनिधीक स्वरुपात हे पथक गुरुवारी म्हणजे आज येवला आणि सिन्नरमधील गावांची पाहणी करणार असून शुक्रवारी (दि. १५) समिती पुण्याला जाणार आहे.