Nashik Drought | उ. महाराष्ट्रात दुष्काळाची स्थिती काय? आजपासून केंद्रीय पथक करणार पाहणी


Nashik Drought | यंदा अत्यल्प झालेल्या पावसामुळे राज्यातील अनेक भागात दुष्काळजन्य स्थिती आहे. अनेक भागात डिंसेबर महिन्यातच ट्रॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील निर्माण झालेल्या या दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक महाराष्ट्रात दाखल झाले असून केंद्रीय कृषी मंत्रालयाचे 12 सदस्यांचे पथक राज्यातील दुष्काळ आणि खरीप नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्याचा आजपासून दोन दिवसीय दौरा करणार आहेत. ज्यात दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 14 डिसेंबर रोजी पुणे आणि सोलापूर, नाशिक, नंदूरबार तसेच जळगावमध्ये हे पथक दुष्काळ पाहणी करणार आहेत. 

यंदा राज्यातील दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्याकरिता केंद्रीय कृषी मंत्रालयाचे 12 सदस्यांचे पथक मराठवाड्यात दाखल झाले असून आज तसेच उद्या  मराठवाड्यातील चार जिल्ह्यात त्यांच्याकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.

उत्तर महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश?

केंद्रीय केंद्रीय कृषी मंत्रालयाचे 12 सदस्यांचे पथकाने मराठवाड्यात आज पाहणी दौरा केल्यानंतर हे पथक उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात उद्या (दि. १४) पाहणी करणार आहे. ज्यात, नाशिक, पुणे, सोलापुर, जळगाव या जिल्ह्यांचा समावेश आहे. दोन वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून ही केंद्रीय पाहणी केली जाणार असून विशेष म्हणजे संपूर्ण पाहणी दौरे संपल्यावर पुण्यात एक महत्वाची बैठक घेऊन अहवाल केंद्राकडे पाठवला जाणार आहे. 

केंद्रीय पथकात कोणाचा समावेश?

केंद्रीय कृषी विभागाच्या सहसचिव प्रिया राजन या केंद्रीय कृषी मंत्रालयाचे 12 सदस्यांचे पथकप्रमुख आहेत. त्यांच्या नेतृत्वात चार पथक तयार करण्यात आले असून यामध्ये एमआयडीएचे सचिव मनोज के आहेत. तसेच

सहसंचालक जगदीश साहू,

नीति आयोगाचे संशोधन अधिकारी शिवचरण मीना,

पाणीपुरवठा विभागाचे अतिरिक्त सल्लागार ए. मुरलीधरन,

जलसंपदा विभागाचे संचालक हरीश उंबरजे,

ग्रामविकास विभागाचे उपसचिव प्रदीपकुमार,

पुरवठा विभागाचे सचिव संगीतकुमार,

पशुसंवर्धन विभाग सहआयुक्त एच. उपसचिव प्रदीपकुमार,

पुरवठा विभागाचे सचिव संगीतकुमार,

पशुसंवर्धन विभाग सहआयुक्त एच. आर. खन्ना,

कापूस विकास विभागाचे संचालक डॉ. ए. एच. वाघमारे,

एमएनसीएफसीचे उपसंचालक डॉ. सुनील दुबे,

एमआयडीएचे कन्सलटंट चिराग भाटिया या सर्व दिग्गजांचा या केंद्रीय पाहणी पथकात समावेश आहे.