Nashik Weather | आज ‘या’ भागात पाऊस पडण्याची शक्यता


Nashik Weather | भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील 4-5 दिवसांत उत्तर भारतात दाट धुके आणि थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता असून उत्तर-पश्चिम भारतातील मैदानी भागात पुढील 5 दिवसांत थंडीची तीव्र लाट कायम राहण्याची शक्यता वर्तवलेली आहे.

आज 18 जानेवारी रोजी बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम आणि ईशान्य भारतात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून 20 तारखेपर्यंत काही तास पंजाब, हरियाणा आणि चंदीगडच्या अनेक भागांवर दाट धुके राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 21 आणि 22 जानेवारी रोजी सकाळी विविध भागात दाट धुके राहण्याची शक्यता आहे.

Nashik Weather | वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता

पश्चिम हिमालयीन प्रदेश येथे नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता असून या वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे मंगळवारी आणि बुधवारी जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये वेगळ्या ठिकाणी हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मंगळवारी देशाच्या दक्षिणेसह काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

Nashik Weather | वाढत्या थंडीने द्राक्ष बागायतदारांमध्ये वाढली चिंता

सध्या महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यात थंडीने कहर केल्याचं दिसून येत असून कांदा, गहू, हरभरा या पिकांसाठी ही थंडी फायद्याची ठरण्याची शक्यता आहे. मात्र तसेच वाढत्या थंडीने द्राक्ष बागायतदारांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. यातच निफाड तालुक्यातील कुंदेवाडी कृषी संशोधन केंद्रात 7.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली असून सोमवारी (दि. १५) रोजी ६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे सोमवारी निफाडला निचांकी तापमान नोंदवले गेले आहे. दरम्यान, आणखी दोन ते तीन दिवस नाशिक जिल्ह्यात थंडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे.