Maharashtra Weather | महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून विदर्भासह काही भागांत अवकाळी पावसाने जोर धरला आहे. यातच आता हवामान खात्याने नवा अंदाज वर्तविला आहे. यानुसार येत्या चार राज्यातील काही भागांत अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. (Maharashtra Weather)
सध्या राज्यात काही ठिकाणी नागरिक उष्णतेच्या लाटेने (Heatwave) हैराण आहेत. तर, दुसरीकडे पूर्व विदर्भाच्या काही भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस बरसत असून, काही भागात गारपीटदेखील होत आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज पश्चिम महाराष्ट्रातही अवकाळी बरसण्याची शक्यता आहे. तर, हा पाऊस पुढील चार दिवस कायम असणार असल्याचंही हवामान विभागाने (Weather Forecast) सांगितले आहे.
Maharashtra Weather | ‘या’ भागांत उष्णता वाढणार
राज्यात कोकण, मुंबईसह उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट असून, अनेक दिवसांपासून उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार (IMD Forecast) पुढील चार दिवस मुंबईसह कोकण पट्टयातील उष्णता कायम राहणार असून, तापमानात किंचित वाढ होऊ शकते.
Weather Update | सावधान..! आता वेस्टर्न डिस्टर्बन्सचाही धोका उद्भवणार..?
‘या’ भागात अवकाळी बरसणार
राज्यात पूर्व विदर्भात मागील काही दिवसांपासून जोरदार अवकाळी पाऊस बरसत असून, या भागाला गारपिटीनेही झोडपलं आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार (IMD Forecast) पूर्व विदर्भात पुढील ४ दिवस अवकाळी पाऊस कायम राहणार आहे. पूर्व विदर्भात मंगळवारपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपीट सुरू असून, यामुळे फळबागांसह शेतपीकांचे मोठे नुकसान झाले आहे.
तर, विदर्भात जिल्ह्यांत काही ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तविला असून, यासोबत मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातही काही ठिकाणी वीजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलक्या श्री बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Weather Department | केंद्र शासनाचा मोठा निर्णय; ‘हे’ केंद्र होणार बंद
पुढील चार दिवसांचा हवामान अंदाज
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात येत्या चार दिवसांत अवकळी पाऊस बरसण्याची शक्यता आहे. तर, विदर्भ आणि मराठवाड्यात १२ मेपर्यंत पुढील चार वीजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा, नांदेड, लातूर, आणि हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Weather)