Weather Update | सावधान..! आता वेस्टर्न डिस्टर्बन्सचाही धोका उद्भवणार..?


Weather Update |

Weather Update | हवामानात दिवसेंदिवस बदलत होत असून, राज्यात थंडी कमी होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, पुढील दोन दिवस वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम भारतात दिसून येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. थंडी आता कमी होत असून, राज्यातील तापमानात वाढ झाली आहे. काही राज्यांमध्ये चांगला सूर्यप्रकाश आहे. मात्र, अनेक ठिकाणी थंडीचा कहर हा सुरूच आहे.

Weather Update | हवामानात कोणते बदल होणार..?

पुढील दोन दिवसात राज्यातील वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे. थंडी कमी होण्याची शक्यता असून, तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्याचबरोबर मैदानी भागात किमान तापमान ६ ते ९ अंश सेल्सिअस इतके असून, वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम पुढील दोन दिवस वायव्य भारतात होऊ शकतो असे हवामान विभागाने सांगितले आहे.

Weather Department | केंद्र शासनाचा मोठा निर्णय; ‘हे’ केंद्र होणार बंद

येत्या ३ फेब्रुवारीपासून जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये हलके ते मध्यम हिमवृष्टीचा होऊ शकते. तर, ३० आणि ३१ जानेवारी रोजी काश्मीरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस-बर्फवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचबरोबर ३१ जानेवारी रोजी उत्तराखंडमध्येदेखील काही ठिकाणी हलका किंवा मध्यम पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दिल्ली-एनसीआर आणि आसपासच्या राज्यांमध्ये थंडी हळूहळू कमी होत असून, राजस्थान आणि बिहारसह अनेक भागात तापमान सामान्यपेक्षा ३-६ अंश सेल्सिअस कमी राहू शकते. पुढील ७ दिवसांत मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशात हलक्या पावसासह हिमवृष्टी होईल. (Weather Update)

Weather Update | वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे काय..?

वेस्टर्न डिस्टर्बन्स हे भूमध्यसागरीय प्रदेशात उद्भवणारे अतिरिक्त वादळ आहे. हे भारतीय उपखंडाच्या वायव्य भागांमध्ये अचानक हिवाळ्यातील पाऊस आणत असते. तर, याची शक्यता आता भारतात देखील उद्भवू शकते, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स, विशेषत: हिवाळ्यात सखल भागात मध्यम ते मुसळधार पाऊस आणतात तसेच यामुळे भारतीय उपखंडातील पर्वतीय भागात जोरदार बर्फ पडतो. वेस्टर्न डिस्टर्बन्स सहसा ढगाळ आकाश, रात्रीचे उच्च तापमान आणि असामान्य पाऊस यांच्याशी संबंधित असतात. वेस्टर्न डिस्टर्बन्स अधूनमधून दाट ढग आणि मुसळधार पर्जन्यवृष्टी निर्माण करू शकतात.

Weather Update | ‘या’ कारणामुळे पुढील ५ दिवस थंडीची लाट राहणार तीव्र

दरम्यान, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे अतिवृष्टीमुळे, पिकांचे नुकसान, भूस्खलन, पूर आणि हिमस्खलन होऊ शकते. त्यातच थंड लाटेची परिस्थिती आणि दाट धुके निर्माण होत असतात. हिवाळ्यानंतर वेस्टर्न डिस्टर्बन्सची संख्या कमी होत असते. तर एप्रिल आणि मे महिन्यात म्हणजेच उन्हाळ्यात ते उत्तर भारतात फिरत असतात. मात्र, यावेळी असे झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. (Weather Update)