Weather Department | केंद्र शासनाचा मोठा निर्णय; ‘हे’ केंद्र होणार बंद


Weather Department | महाराष्ट्रातील ‘या’ केंद्रांचा देखील समावेश..

भारतीय हवामानशास्त्र विभागाने नुकताच आपला १५० वा वर्धापन दिन साजरा केला आहे. याच दिवसाचे औचित्य साधून तंत्रज्ञानाच्या मदतीने एमआयईडीचे अंदाज अगदी तंतोतंत खरे ठरत आहे. अशा शब्दात देशाचे उपराष्ट्रपती प्रदीप धनखड यांनी हवामान केंद्रांचे कौतुक केले आहे. मात्र जागतिक स्तरावर होणाऱ्या वातावरणातील बदलांचा परिणाम हा शेतीवर होत असतो. तर एमआयईडीची १९९ कृषी हवामान केंद्र बंद होणार आहेत. तर, यात महाराष्ट्रातील तब्बल ११ हवामान केंद्रांचा समावेश करण्यात आला आहे. हवामान अंदाज देणारी हि हवामान केंद्र येत्या २९ फेब्रुवारी पासून रोजी बंद केली जाणार आहे. (Weather Department)

Weather Update | नाशकात थंडीचा कहर; द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली

 शेतकऱ्यांना भारतीय हवामान विभाग (आयएमडी) आणि  भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) यांच्या समन्वयाने जिल्हास्तरावर हवामान सल्ला मिळत असेतो. त्या आधारे पीक व्यवस्थापन करता यावे आणि  त्यातून पीक नुकसान कमी व्हावे, या उद्देशातून देशभरात १९९ तर महाराष्ट्रात 11 केंद्रे उघडण्यात आली होती. या जिल्हा कृषी हवामान केंद्राद्वारे आठवड्यातून मंगळवारी आणि  शुक्रवारी असे दोन दिवस हवामानाचा अचुक अंदाज, हवामान आधारित कृषी सल्ला शेतकरी बंधूंना प्राप्त होत असे. मात्र निधी उपलब्धतेची अडचण असल्याचे सांगत अवघ्या पाच वर्षांतच हा शेतकरी हिताचा उपक्रम बंद होणार आहे.

Weather Update | ‘या’ कारणामुळे पुढील ५ दिवस थंडीची लाट राहणार तीव्र

दरम्यान, शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना १ मार्च २०२४ पासून हवामान आधारित कृषी सल्ला सेवा प्राप्त होणार नाही. केंद्रीय अर्थ मंत्रांलायाकडून हवामान विभागाच्या निधीमध्ये कपात केल्याचे सांगितले जात आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या भारतीय हवामान खात्याच्या  परीपत्राकानुसार देशातील शेतकरी हितार्थ काम करणारी ही १९९ जिल्हा कृषी हवामान केंद्र बंद करण्यात येणार आहे. (Weather Department)

Weather Department | हि ११ केंद्रे होणार बंद..

यात प्रामुख्याने पालघर, धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, नंदुरबार, नागपूरचे सीआयसीआर, अमरावती जिल्ह्यातील दुर्गापूर, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यातील साकोली, वाशीम जिल्ह्यातील कराड आणि बुलढाणा अशी ११ हवामान केंद्र बंद होणार आहेत. मंगळवार आणि शुक्रवार असा दोन दिवस हवामान आधारित सल्ला दिला जात होता.

तर अचानक हे हवामान केंद्र बंद होणार असल्याने याचा फटका शेतकर्यांना होणार आहे. सरकारचा हा निर्णय देशातील असंख्य शेतकऱ्यांसाठी, कृषी उत्पन्न बाजार समिती, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेती क्षेत्रासाठी चिंताजनक असून शेवटी याचे नकारात्मक रूपांतर राष्ट्रीय आर्थिक विकास दरात होणार असल्याची भिती आहे.