Maharashtra Weather Update | उत्तर महाराष्ट्रातील ‘या’ भागांत पुढील चार दिवस पाऊस


Maharashtra Weather Update |  राज्यात अनेक भागात काल अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तर, काही भागांत गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून, येथे मोठ्या प्रमाणात पीकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आजही हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट'(Yellow alert) दिला असून, या भागांत आजही जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Update)

दरम्यान, हवामान विभागानं (IMD) वर्तविलेल्या अंदाजानुसार, आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, यासह काही भागांत जोरजार अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता असून, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाची शक्यता आहे. यात उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यातील काही भागातही जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो. या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आणि शेतकऱ्यांना योग्य ती सर्व खबदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 Maharashtra Weather | राज्यात ‘या’ भागांत अवकाळी बरसणार; तर, ‘या’ भागांत उष्णता वाढणार

Maharashtra Weather Update | राज्यात या भागांत पाऊस – 

राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

  1. उत्तर महाराष्ट्रात – नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर सामान्य पावसाचा अंदाज. 
  2. कोकण – रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जोरदार पावसाची शक्यता. 
  3. मराठवाडा – छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता. 
  4. पश्चिम महाराष्ट्रात – पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता. 

राज्यात पुढील चार ते पाच दिवस जोरदार वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली असून, या पार्श्वभुमीवर 13 मे रोजी होणारे मतदान हे पावसाच्या अंदाजामुळं सकाळीच करावं यासाठी नियोजन सुरू आहे. कारण 13 मे रोजी वरील जिल्ह्यातील काही ठिकाणी मतदान आहे आणि ते शक्यतो सकाळी लवकर करणे गरजेचं आहे.(Maharashtra Weather Update)

Weather Department | केंद्र शासनाचा मोठा निर्णय; ‘हे’ केंद्र होणार बंद