Maharashtra Rain | संपूर्ण राज्याला यलो अलर्ट; वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस


Maharashtra Rain | यंदाचे वर्ष हे अल निनोचे वर्ष असल्याने यावर्षी उष्णतेचे प्रमाण अधिक होते. तसेच यामुळे यंदा पाऊसही काही भागात जोरदार कोसळला. तर, काही भागात पावसाने हुलकावणी दिली. या उन्हाळ्यात उन्हाने कहर केल्याने शहरी भागातील नागरिकही पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. दरम्यान, अखेर पावसाने राज्यातील बहुतेक भागांत हजेरी लावली असून, महाराष्ट्रात मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला आहे. 

आजपासून पुन्हा एकदा मान्सून राज्यात सक्रीय झाला असून, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत मुसळधार पाऊस बरसत आहे. राज्यात सर्वत्र मान्सून पोहचला असल्याने मुंबई हवामान विभागाकडून आज संपूर्ण राज्यात आज ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. अनेक शहरांत आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, हलक्या सरी बरसत आहेत. तर, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांत मध्यम ते मुसळधार स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.  (Maharashtra Rain)

Unseasonal Rain | देवळा तालुक्याला अवकाळीचा फटका; डाळिंब बागा, शेड जमीनदोस्त

‘या’ तारखेनंतर पावसाचा जोर वाढणार

दरम्यान, राज्यात मान्सून लवकर दाखल झाला असून, गेलूया काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, आता राज्यातील अनेक भागांत पाऊस सक्रीय होताना दिसत आहे. तसेच हवामान विभागाच्या अंदाजानुसार २० जूननंतर राज्यात मान्सूनचा जोर वाढण्याची शक्यता आहे. १९ ते २० जूननंतर मान्सूनसाठी राज्यात अनुकूल वातावरण निर्माण होणार आहे.  

आतापर्यंत ३६ लोकांचा उष्मघाताने मृत्यू

महाराष्ट्रासह अनेक राज्यात पाऊस सुरू झाला असला तरी उत्तर भारतात मात्र उष्णतेची लाट कायम आहे. या भागात अनेक ठिकाणी तापमान ५० डिग्रीवर पोहोचले असून, आतापर्यंत ३६ लोकांचा उष्मघाताने मृत्यू झाल्याची माहीती समोर आली आहे. तर, दुसरीकडे बिहारमध्ये उष्णतेने १२८ वर्षांतील रेकॉर्ड मोडला आहे. वाराणसी, प्रयागराज, कानपूर सारख्या शहरांत तापमान ४६ अंशावर गेले आहे.(Maharashtra Rain)

Maharashtra Rain | नाशिकमध्ये काही तासांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

Maharashtra Rain | खरीपाच्या पेरणीला सुरुवात

दरम्यान, वाशिम जिल्ह्यासह शेजारील भागात अनेक ठिकाणी रविवारी रात्रीपासून वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. ज्या भागात पेरणी झाली आहे. अशा पीकांना या पावसामुळे आधार मिळाला आहे. गेल्या कित्येक दिवसापासून पावसाची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून, शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. परभणी, नांदेड या जिल्ह्यातदेखील रविवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असून, यामुळे खरीपाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. तर, अनेक भागांत सोयाबीन, मूग, उडीद, कापूस लागवडही सुरू झाली आहे.  (Maharashtra Rain)