Farmers Loan | शेतकऱ्यांनो..! नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार देतंय अनुदान


Farmers Loan |  या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला आणि याचे मूळ कारण म्हणजे भाजप प्रणित सरकारचे ‘शेतकरी धोरण’. याच पार्श्वभूमीवर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी हीताच्या योजनांवर भर दिला आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला असून, यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार हलका होणार आहे. राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. 

या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार असून, योजनेतील लाभार्थ्यांच्या गावनिहाय याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, तसेच विविध कार्यकारी सहकारी संस्थांकडून घेतलेल्या पीक कर्जाची नियमित परतफेड केली आहे. अशा शेतकऱ्यांना सरकार २ लाख रुपयांपर्यंत अनुदान देणार आहे. तर, हे अनुदान थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारने प्रत्येक गावातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत.  

Electricity for Farmers | आता राज्यातील शेतकऱ्यांना कमी दरात आणि दिवसा वीज मिळणार

Farmers Loan | अशी आहे प्रक्रिया

दरम्यान, आपण या योजनेचे लाभार्थी आहोत की, नाही हे पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित वेबसाइटवर जाऊन आवश्यक माहिती भरावी. आपला गाव, तालुका किंवा जिल्ह्याचे निवडावा. यानंतर आपल्या भागातील लाभार्थ्यांची यादी दिसेल. यानंतर शेतकऱ्यांनी आपली माहिती तपासावी काही चूक आढळल्यास कृषी विभाग किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधाण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. 

Farmers Loan | शेतकऱ्यांनो कर्ज हवंय? ‘या’ योजनेच्या माध्यमातून घ्या लाभ

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे मुख्य उद्देश्य हे शेतकऱ्यांमध्ये आर्थिक आणि कर्ज विषयक शिस्त निर्माण करणे हा असून, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे हा आहे. तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यासाठीही योजनेची निर्मिती करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारची ही योजना शेतकरी हीतासाठी असून, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी या योजेनचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरी शेतकऱ्यांनी अशाच प्रमाणे नियमित कर्जफेड करावी. कारण यामुळे कृषी क्षेत्राला बळकटी मिळेल, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.