Kisan Credit Card | आता शेतकऱ्यांना १० मिनिटांत घरबसल्या विनातारण कर्ज मिळणार


Kisan Credit Card | पेरणीच्यावेळी शेतकऱ्यांना बियाणे, खते, औषधांची खरेदी, ई. बाबींसाठी शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागते. दरम्यान, यावेळी शेतकऱ्यांना कमी व्याज दरात आणि सहज कर्ज मिळावे. यासाठी सरकारकडून अनेक कर्ज योजना राबविल्या जातात. त्यापैकीच एक महत्त्वकांक्षी योजना म्हणजे ‘किसान क्रेडिट कार्ड’. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सुलभरीत्या कर्ज घेता येते. दरम्यान, आता या योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी बँकांकडून होणारा शेतकऱ्यांचा जाच हा आता कमी होण्यास मदत होणार आहे. (Kisan Credit Card)

मात्र, केंद्र सरकार हा प्रयोग देशातील केवळ दोनच जिल्ह्यांत राबविणार आहे. यात ‘ऍग्री स्टॅक’ या ॲपद्वारे केवळ एका क्लिकवर आणि दहा मिनिटांत दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर होणार असून, हे कर्ज विनातारण मिळणार असून, थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहे. दरम्यान, हा प्रयोग केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील बीड आणि उत्तर प्रदेशमधील फारुखाबाद या दोन जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर येत्या मे पासून राबविला जाणार आहे.

PM Kisan 16th Installment | ज्यांना पीएम किसानचा हप्ता मिळाला नाही त्यांनी काय करायचं..?

दरम्यान, राज्य सरकारच्या भूमी अभिलेख या विभागाने मागील दोन वर्षांपासून ई- पीक पाहणी अर्थात पिकांची किसान कार्ड, रुपे ही ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी ॲप विकसित केले असून, याच ॲपच्या धर्तीवर केंद्र सरकारनेही पूर्ण देशातील शेतकऱ्यांसाठी एकाच ॲपद्वारे पिकांची नोंदणी करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार आता खरीप हंगामापासून पूर्ण देशात एकाच ॲपवर या पिकांची नोंदणी करण्यात येणार आहे. ही नोंदणी शेतकऱ्यांनीच करायची असून, यामुळे एकूण पीक क्षेत्राची अचूक नोंद होणार आहे.

जमिनीचे सातबारा उतारे आधार क्रमांकाशी संलग्न करा

‘पंतप्रधान किसान सन्मान निधी’ या योजनेसाठी शेतकऱ्यांचे बैंक खाते हे आधार कार्डशी संलग्न केले आहे. तसेच, यासाठी आता सर्व जमीन नोंदी तपासल्या जाणार असून, त्याची सत्यता पडताळली जाणार आहे. ई-पीक पाहणी आणि जमीन नोंदीच्या उपलब्ध माहितीचा आधार घेत प्रायोगिक तत्त्वावर बीड आणि फारुखाबाद या दोन्ही जिल्ह्यांत शेतकऱ्यांच्या जमिनीचे सातबारा उतारे हे त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न करण्यात आले आहेत. तर, बीड जिल्ह्यात आतापर्यंत ६५ टक्के शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे सातबारा उतारे हे आधार क्रमांकाशी संलग्न करण्यात आले असून, शेतकऱ्यांना कर्ज देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी, यासाठी येत्या मे महिन्यात या प्रकल्पाला प्रत्यक्षरित्या सुरुवात केली जाणार आहे. (Kisan Credit Card)

PM Kisan Nidhi | उद्या पंतप्रधान शेतकऱ्यांच्या खात्यावर २,००० रुपये जमा करणार

Kisan Credit Card | अशी करा नोंदणी प्रक्रिया

  • ‘ऍग्री स्टॅक ॲप’ डाऊनलोड केल्यानंतर तेथे आपले नाव व आधार क्रमांक टाका.
  • त्यानंतर ओटीपी येईल व ओटीपीद्वारे पडताळणी होईल.
  • फेस आयडी घेतले जाईल आणि शेतकऱ्याची खात्री केली जाईल.
  • समोर आलेली माहिती भरा व तुमचे खाते असलेल्या बँकांच्या कर्जाची ऑफर दिसेल.
  • त्यापैकी एक ऑफर स्वीकारा आणि पुढील प्रक्रिया करा.
  • किसान क्रेडिट कार्डद्वारे एक लाख साठ हजारांपर्यंतच्या कर्जाला तारण लागत नसल्याने दहा मिनिटांत कर्ज खात्यावर जमा होईल.