Electricity for Farmers | आता राज्यातील शेतकऱ्यांना कमी दरात आणि दिवसा वीज मिळणार


Electricity for Farmers | राज्य सरकारने शेतकऱ्यांना आनंदवार्ता दिली असून, यामुळे आता शेतकऱ्यांची लोड शेडिंगची समस्या आणि रात्रपाळी बंद होणार आहे. तर सरकारच्या या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना दिवसा आणि माफक दरात वीज मिळणार आहे. तर, शेतीसाठी दिवसा वीज मिळावी, ही शेतकऱ्यांकडून सातत्याने होणारी मागणी आता पूर्ण होणार आहे आणि आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या कृषि जगतात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार असल्याची भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. (Electricity for Farmers)

राज्यातील शेतकऱ्यांना दिवसाही वीज मिळणार

दरम्यान, राज्यात सरकार ‘मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना 2.0‘ राबवत असून, राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९००० मेगा वॅाटच्या कामाचे ‘लेटर ऑफ अवॉर्ड’ देऊन स्पर्धात्मक माध्यमातून निविदा अंतिम केल्या असून, यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना दिवसाही वीज मिळणार आहे.

Farmers Protest | शेतकऱ्यांवर बळाचा वापर; अश्रुधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज

Electricity for Farmers | वार्षिक भाडे देखील मिळणार

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिवसाही वीज मिळावी यासाठी ९००० मेगा वॅाटच्या निविदा अंतिम करण्यात आल्या असून याद्वारे ४०,००० कोटींची गुंतवणूक केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, या योजनेमुळे २५,००० इतकी रोजगार निर्मिती केली जाणार असून, यामुळे शेतकऱ्यांना १.२५ लाख रुपये प्रति हेक्टर इतके वार्षिक भाडे देखील मिळणार असल्याची माहिती सांगितली जात आहे. तर, २०२५ मध्ये ४० टक्के कृषि फिडर हे सौर ऊर्जेवर येणार असून, येत्या १८ महिन्यात हा प्रकल्प पूर्ण करणार असल्याची सरकारची तयारी आहे. दरम्यान, सोबत काम करून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आगामी १५ महिन्यातच पूर्ण करण्याचा देखील विश्वास यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

Farmers Protest | शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानेच राजधानी बिथरली

८ लाख सौर ऊर्जा पंप देणार

दरम्यान, आज निविदा मंजूर झाल्या असून, आता उद्यापासून उर्वरित कृषि फिडर देखील सौर ऊर्जेवर कसे आणता येतील, याबाबतचे नियोजन सुरू करण्याचे आणि ८ लाख सौर ऊर्जा पंप सुद्धा आपल्याला द्यायचे आहेत असे निर्देश यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. सन २०१६ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ही संकल्पना आणली होती. याअंतर्गत पहिला पायलट प्रकल्प हा समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगण सिद्धी या गावी साकारण्यात आला होता. त्यावेळी २००० मेगा वॅाट इतकी सौर ऊर्जा तयार करण्यात आली होती. दरम्यान, हुडको या कंपनीसोबत सामंजस्य करार झाला असून, या कार्यक्रमाच्या पुढील अंमलबजावणीसाठी ५००० कोटी देणार असल्याचेही यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.(Electricity for Farmers)