Farmer Scheme | आनंदाची बातमी, शेतकऱ्यांसाठी ‘ही’ मोहीम सरकार राबविणार..
Farmer Scheme | शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार येत्या काही काळात कृषी कर्जाचे उद्दिष्ट वाढवण्याची शक्यता आहे. पुढील वर्षांसाठी अर्थसंकल्पात कृषी कर्जाचे उद्दिष्ट २२ ते २५ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल. त्याचबरोबर प्रत्येक पात्र शेतकऱ्याला कर्ज उपलब्ध होईल, याची खात्री केंद्र सरकार घेणार आहेत. तसेच, चालू आर्थिक वर्षासाठी सरकारचे कृषी कर्जाचे लक्ष्य २० लाख कोटी रुपये आहे. सरकार कृषी कर्जावर अधिक लक्ष असून, लवकरच शेतकऱ्यांना कर्जाविषयी आनंदाची बातमी मिळणार आहे. (Farmer Scheme)
Farmer Scheme | कृषी कर्जाविषयी अधिक माहिती..
वेळेवर हप्ता भरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी ३ टक्के अतिरिक्त व्याज सवलतही दिली जात आहे. शेतकरी दीर्घ मुदतीचे कर्ज देखील घेऊ शकतात. मात्र, व्याज दर बाजाराच्या दरानुसार आहे. येत्या २०२४ आणि २५ या आर्थिक वर्षासाठी कृषी कर्जाचे लक्ष्य २२ ते २५ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
Farmer Scheme | मराठा आंदोलनामुळे शेतकऱ्यांचे अनुदान लांबणीवर..?
त्याचबरोबर केंद्र सरकार कृषी-कर्जावर अधिक लक्ष देत आहे. त्याव्यतीरिक्त सरकार उरलेल्या पात्र शेतकऱ्यांना ओळखण्यासाठी आणि त्यांना कर्ज लाभासाठी अनेक मोहिमा देखील राबवित आहे. कृषी मंत्रालयाने एका केंद्रित दृष्टिकोनाचा भाग म्हणून कर्जासाठी एक स्वतंत्र विभाग देखील तयार केला आहे.
सध्या, सरकार सर्व वित्तीय संस्थांसाठी ३ लाख रुपयांपर्यंतच्या अल्प-मुदतीच्या कृषी कर्जावर २ टक्के व्याज सवलत प्रदान करते. शेतकऱ्यांना वर्षाला ७ टक्के सवलतीच्या दराने ३ लाख रुपयांपर्यंतचे कृषी कर्ज मिळत आहे. त्याचबरोबर २०२२ आणि २३ मध्ये कृषी कर्जाचे वितरण २१.५५ लाख कोटी रुपये आहे. गेल्या १० वर्षात विविध कृषी आणि संलग्न कामांसाठी कर्ज वाटप जास्त झाले आहे. सरकारी आकडेवारी दर्शवते की चालू आर्थिक वर्षात डिसेंबर २०२३ पर्यंत २० लाख कोटी रुपयांच्या कृषी-कर्जाच्या उद्दिष्टापैकी सुमारे ८२ टक्के लक्ष्य पूर्ण झाले आहे.
Farmers News | देशातील ‘या’ शेतकऱ्यांवर सरकार लावणार कर?
त्याचबरोबर अधिकृत आकडेवारीनुसार, या कालावधीत खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही बँकांकडून सुमारे १६.३७ लाख कोटी रुपयांची कर्जे वितरित केली गेली आहे. तर, कृषी-कर्ज वितरण या आर्थिक वर्षातही उद्दिष्टापेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. किसान क्रेडिट कार्ड (KCC) च्या माध्यमाद्वारे ७.३४ कोटी शेतकऱ्यांना कर्ज मिळाले आहे. तर, ३१ मार्च २०२३ पर्यंत सुमारे ८.८५ लाख कोटी रुपये थकीत होते. (Farmer Scheme)