Farmer Subsidy | ‘या’ पीकांची लागवड केल्यास सरकार देणार भरघोस अनुदान


Farmer Subsidy | आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणली आहेत. यात काही विशेष पिकांच्या उत्पादनासाठी सरकार शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. दरम्यान, आता पीक विविधीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सुगंधी व औषधी वनस्पतींच्या लागवडीला सरकार प्रोत्साहन देत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि या वनस्पतींचा तुटवडा पडू नये हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे. तर, या औषधी पिकांमध्ये लेमनग्रास, पामरोसा, शतावरी, तुळस आणि खस यांचा समावेश आहे. तर, विशेष म्हणजे या पिकांच्या लागवडीसाठी सरकार शेतकऱ्यांना भरघोस अनुदानही देत आहे. दरम्यान, या अनुदानाचा आणि या खास योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहेत. २२ जानेवारीपासून सुरू झालेल्या पीक विविधीकरण या योजनेच्या अंतर्गत शेतकरी अर्ज करू शकणार आहेत.(Farmer Subsidy)

किती अनुदान मिळणार?

बिहार राज्याच्या कृषी विभागाच्या एका ट्विटनुसार, पीक विविधीकरण योजनेच्या अंतर्गत बिहार सरकार राज्यातील शेतकऱ्यांना सुगंधी तसेच औषधी वनस्पतींची लागवड करण्यासाठी ५० टक्के इतके अनुदान देणार आहे. तसेच या अंतर्गत, प्रत्येक शेतकऱ्याला प्रति हेक्टर १.५ लाख रुपये युनिट खर्चाच्या ५० टक्के म्हणजे ७५,००० रुपये लेमनग्रास, पामरोसा, शतावरी, तुळस व खुस या रोपांच्या लागवडीसाठी दिले जाणार आहेत. तर, ही रक्कम थेट संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी किमान १ हेक्टर ते ४ हेक्टरपर्यंत शेती करणे बंधनकारक आहे. (Farmer Subsidy)

Farmer Pension | आता शेतकऱ्यांनाही मिळणार ‘पेन्शन’

Farmer Subsidy | कसा कराल अर्ज..?

१. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला फलोत्पादन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.

२. फलोत्पादन संचालनालयाच्या अंतर्गत असलेल्या योजनांबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन पोर्टलवर जाऊन तेथे होम पेजवर क्लिक करावे लागेल.

३. येथे तुम्हाला ‘क्रॉप डायव्हर्सिफिकेशन स्कीम’ या अंतर्गत अर्जाचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून
नंतर नवीन पेजवर काही नियम व अटी तुमच्या समोर ओपन होतील.

४. अटी व शर्ती वाचून माहितीशी सहमत असल्यास तेथील पर्यायावर क्लिक करा. यानंतर अर्जाचा फॉर्म दिसेल.

५. अर्जात विचारलेली सर्व आवश्यक माहिती तेथे भरा.

६. माहिती प्रविष्ट केल्यानंतर, सर्व आवश्यक कागदपत्रे तेथे अपलोड करावी लागतील.

७. सर्वात शेवटी ‘सबमिट’ या पर्यायावर क्लिक करा.(Farmer Subsidy)

Farmer Sucide | नशिक जिल्ह्यात यावर्षी किती शेतकऱ्यांचा बळी..?

माहितीसाठी येथे संपर्क साधा

जर तुम्हाला वरील सुगंधी व औषधी वनस्पतींची लागवड करायची असल्यास तसेच या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बिहार कृषी विभाग, फलोत्पादन संचालनालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. तसेच याबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी जिल्ह्यातील फलोत्पादन विभागाशीही संपर्क साधू शकतात.