Farmer Sucide | नशिक जिल्ह्यात यावर्षी किती शेतकऱ्यांचा बळी..?


तनुजा शिंदे : Farmer Sucide | नाशिक जिल्हा हा ‘बागायती’ प्रदेश म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या काही वर्षात सताटक्या आस्मानी संकटांमुळे नाशिकच्या शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. अवकाळी पाऊस, दुष्काळ यांसारखी स्थिती निर्माण झाल्याने शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय झाला आहे. अवकाळीच्या तडाख्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घासही हिरावला गेला. एवढे कमी होते की, नाशिक जिल्ह्यात पिकणारे मुख्य पीक ‘कांदा’ यावर निर्यातबंदी लाऊन केंद्र सरकारने शेतकऱ्यांची आणखी कंबरडे मोडण्याचे काम केले. दरम्यान, या सततच्या परिस्थितीला वैतागलेल्या आणि हतबल झालेल्या नशिक जिल्ह्यातील शासकीय आकडेवारीनुसार तब्बल बारा शेतकऱ्यांनी आपले आयुष्य संपवले आहे.

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकरी आत्महत्यांच्या घटना उघडकीस आल्या असून, जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या काळात एकूण १२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र, त्यापैकी शासनाच्या शेतकरी आत्महत्याच्या निकषात केवळ ४ शेतकरी बसतात. (Farmer Sucide)

Farmer News | शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता; शेतमाल विक्रीसाठी नवी पद्धत

कोणत्या तालुक्यात किती आत्महत्या…

बागलाण – एकूण – ४, अपात्र – २ , प्रलंबित – २

चांदवड – एकूण – १, प्रलंबित – १

मालेगाव – एकूण – ४, पात्र ३, प्रलंबित – १

निफाड – पात्र

येवला – पात्र १ (Farmer Sucide)

Farmer Scheme | शेतकऱ्यांनो…! आता घरबसल्या घ्या या योजनेचा लाभ

Farmer Sucide | या तालुक्यांमध्ये एकही शेतकरी आत्महत्या नाही

नशिक जिल्ह्यात गेल्या वर्षात १२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, पुढील तालुके हे आत्महत्यामुक्त आहेत. यात नाशिक, सिन्नर, देवळा, दिंडोरी, इगतपुरी, कळवण, नांदगाव, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या तालुक्यांचा समावेश असून, गेल्या वर्षभरात येथे शेतकरी आत्महत्येची एकही घटना घडलेली नाही. ही सकारात्मक बाब आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून एक लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. त्यामुळे कुटुंबाला काहीसा हातभार लागण्यास मदत झाली. यासाठी जिल्ह्यातील ६ शेतकरी पात्र ठरले असून, या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून १ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. १२ आत्महत्यांच्या प्रकरणांपैकी २ शेतकऱ्यांच्या आत्महत्या या शासनाच्या निकषात न बसल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत मिळाली नाही. तर, ४ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रकरणं हे अद्यापही प्रलंबित आहेत. विशेष बाब म्हणजे मालेगाव तालुक्यात पाणीप्रश्न गंभीर असल्याने जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्यांच्या घटना या एकट्या मालेगाव तालुक्यात घडल्या असून, जिल्ह्यातील बाकी १० तालुक्यांत शेतकरी आत्महत्यांची संख्या ही शून्य आहे.(Farmer Sucide)