Onion Breaking | सध्या संपुर्ण महाराष्ट्रात कांदा प्रश्न जोरदार पेटलेला असून नाशिक जिल्ह्यातील शेतकरी हे कांदा निर्यातबंदीच्या विरोधात तीव्र निषेध करताना दिसत आहे. आता नाशिक जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत असून नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील नाफेड कार्यालयावर हजारो ट्रॅक्टर घेऊन उमराणा बाजार समितीमधून शेतकरी मोर्चा धडकणार आहे.
Onion Breaking | नाफेड कार्यालयावर कांदा उत्पादक शेतकरी धडकणार
१ जानेवारी २०२४ रोजी नाफेडच्या मनमानी आणि लुटीच्या विरोधात नाफेड कार्यालयावर हजारो ट्रॅक्टर घेऊन उमराणा बाजार समितीमधून शेतकरी मोर्चा धडकणार असून कसमादे पट्ट्यातील तसेच नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी यात सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी ०७:०० वाजता हा शेतकरी मोर्चा निघणार असून कांद्याचे भरलेले ट्रॅक्टर घेऊन कांदा उत्पादक शेतकरी हे पिंपळगाव बसवंत येथील नाफेड कार्यालयावर धडकणार आहेत.
कांद्याचे भाव हे आज ७००-१२०० रुपयांपर्यंत घसरल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत असून यातच १ तारखेनंतर पुन्हा कांद्याचे दर आणखी उतरण्याची शक्यता आहे. आज नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा निर्णय झाला की हजारो ट्रॅक्टर घेऊन उमराणे, देवळा तसेच पुर्ण कसमादे पट्ट्यातील शेतकरी हे पिंपळगाव बसवंत येथील नाफेड कार्यालयावर जाणार आहेत. तसेच लोकप्रतिनीधी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार या प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नाही तर नाफेडमधील भ्रष्ट्राचाराचा संपुर्ण डाटा आम्ही १ जानेवारी नंतर आम्ही पत्रकार परिषद घेऊन याबाबतचा घोटाळा उघड करणार आहोत. – सोमनाथ मगर (नांदगाव तालुका युवा अध्यक्ष राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.
या शेतकरी मोर्चाला राज्य कांदा उत्पादक संघटनेचा पुर्ण पाठिंबा असून नाफेड आणि NCCF मधून कांदा खरेदीच नको किंवा नाफेडने ठरवलेला कांद्याचा दर हा उत्पादन खर्चापेक्षा अधिक असावा म्हणजेच तो ३० रुपयांपेक्षा जास्त असावा. तसेच संपुर्ण राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना एक असायला हव्या. तसेच कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची एक प्रमुख मागमी आहे की, नाफेड आणि NCCF ची कांदा खरेदी बंद केली पाहिजे. – भारत दिघोळे (संस्थापक , महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटना)