Onion Export | 7 डिसेंबर रोजी केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केली. या निर्यातबंदीला कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात तीव्र निषेध दर्शवण्यात येत आहे. केंद्र सरकारने केलेल्या या निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आतोनात नुकसानीला सामोरे जावे लागले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळत आहे.(Onion Export)
Onion Export | कांदा निर्यातबंदी मागे घेण्यात यावी…
कांदा निर्यातबंदी मागे घेण्यात यावी यासाठी अनेक नेते मैदानात उतरले होते मात्र या सगळ्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचं चित्र सध्या स्पष्ट होत आहे. आता कांदा निर्यातबंदी मागे घेण्यात यावी या मागणीसाठी भाजपचे खासदार सुजय विखे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचं खा. विखेंनी सांगितलेलं आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला जाणार असल्याचं खा. विखेंनी स्पष्ट केलं आहे.
कांदा प्रश्न महाराष्ट्रात जोरदार पेटत असताना आता या मुद्द्याची दखल घेत ते म्हणाले की, कांदा प्रश्नी आम्ही लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटणार आहोत, हा प्रश्न अमित शहा यांच्या हाती असल्याने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अमित शहा यांची वेळ मागितलेली आहे अशी माहिती भाजप खा. विखे यांनी दिली आहे.
तसेच यावेळी बाेलताना ते म्हणाले की, दिल्लीमध्ये भेट झाल्यानंतर कांदा निर्यातबंदी ऐवजी इतर पर्याय आम्ही सूचवणार आहोत. या सोबतच जानेवारी महिन्यामध्ये कांदा निर्यात बंदी मागे घेण्याचा निर्णय होऊ शकतो किंवा नाफेड मार्फत कांदा खरेदीचा निर्णय होऊन शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो अशी अपेक्षा सुजय विखे यांनी व्यक्त केली.
कांद्याच्या दरांत घसरण
केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी घातल्याने घाऊक बाजार भावात सध्या सातत्याने चढउतार होत असल्यामुळे आता किरकोळ बाजारातही कांद्याचे दर हे मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. दरम्यान, आशिया खंडातील अग्रेसर कांद्याची बाजारपेठ असलेली लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतही कांद्याच्या सरासरी घाऊक दरांमध्ये घसरण झालेली आहे. तसेच घाऊक बाजारात कांद्याच्या घाऊक भावांत सुमारे १० टक्क्यांनी घसरण झालेली आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत कांद्याच्या दरांमध्ये घसरण होण्याची शक्यता ही व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.