Rain Alert | सध्या महाराष्ट्रातील हवामानात अनेक बदल होताना दिसत असून डिसेंबर महिन्याअखेरीस राज्यात थंडी वाढण्यास सुरूवात झाली असताना राज्यात सध्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. आता राज्यात थंडी आणि धुक्यासह पावसाची हजेरी पहायला मिळणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील तापमान घसरले असून काही जिल्ह्यातील तापमान १० अंशापर्यंत घसरले आहे. मुंबईसह उपनगर, ठाणे आणि कोकणातदेखील तापमानाचा पारा घसरत असून उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात कडाक्याची थंडी जाणवत आहे. दरम्यान, डिसेंबरअखेर तसेच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यातील काही भागात पाऊस हजेरी लागणार असून वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे नववर्षाच्या सुरूवातीला पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे.
निफाड तालुक्यातील तापमान 9 अंशापर्यंत घसरलं…
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात थंडीचा जोर वाढत असून उत्तर महाराष्ट्रात हवेतील गारवा वाढत आहे. तसेच येत्या दोन दिवसात उत्तर महाराष्ट्रातील काही भागात किमान तापमान हे 10 अंशाखाली जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील तापमान हे 9 अंश सेल्सिअसपर्यंत घसरलं आहे.
Rain Alert | अवकाळीनंतर पिकांची काळजी कशी घ्याल?
1) सध्या पडलेल्या आणि पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे सर्व पीक क्षेत्रातील अतिरिक्त पाण्याचा निचरा तात्काळ करावा.
2) ओलीचा फायदा पुरेपूर करून घेण्यासाठी वापश्यावरच रब्बी पिकांची पेरणी करावी.
3) काढणीयोग्य उभ्या अवस्थेतील पिकांची काढणी/ मळणी पाऊस थांबल्यानंतरच करावी.
4) खरीप कांद्याची काढणी पाऊस थांबल्यानंतर किंवा वाफसा आल्यावर करावी.
5) काढणी झालेला खरीप कांदा पातीसकट कोरड्या जागेत सुकवावा.
6) रब्बी हंगामासाठी पेरलेल्या रोपवाटिकेतील पाणी बाहेर काढून द्यावे आणि रोपांना नत्राचा हलका हप्ता द्यावा.