Drones | आता युरिया फवारणीसाठी आले ‘हे’ नवे तंत्रज्ञान


Drones | देशात सध्या कृषी क्षेत्रात अनेक प्रयोग केले जात असून यामुळे शेतकऱ्यांचा आधूनिक शेतीकडे जाण्याचा कल वाढताना दिसत आहे. यातच, महाराष्ट्रातील बारामती जिल्ह्यात आर्टिफिशीयल इंटलिजियन्स (Artificial intelligence) द्वारे टोमॅटो आणि बटाट्याचे एकत्र उत्पादन घेण्यात आले असून भारतासह देशात आर्टिफिशीयल इंटलिजियन्स (Artificial intelligence) चा आधार घेऊन शेती उत्पादन घेण्याचा पहीला यशस्वी प्रयोग ठरला आहे.

याचप्रमाणे भारतात सध्या कृषी क्षेत्रात अनेक बदल करण्यात येत असून केंद्र तसेच राज्य सरकारदेखील देशातील शेतकरऱ्य़ांना आधूनिक शेती करण्यासाठी प्रोत्साहीत करत आहे. दरम्यान, हरियाणा सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी ऐतिहासिक पाऊल उचलत युरिया फवारणी करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान (Drones Technology) वापरण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना ड्रोन (Drones) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ड्रोन तंत्रज्ञान (Drones Technology) ही सुविधा राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी, असे निर्देश कृषी विभागाला देण्यात आले असून हरीयाणा सरकार शेतकऱ्यांना नॅनो युरिया फवारणी करणे सोपे व्हावे म्हणुन ही योजना राबवत आहे. हरीयाणा सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना नॅनो युरिया (Nano Uriya) फवारणी करताना होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळणार आहे.

दरम्यान, सध्या हरीयाणा राज्यातील शेतकरी मोहरी आणि गहू या पिकांवर नॅनो युरियाची फवारणी करत असून राज्यातील कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना नॅनो युरियाही उपलब्ध करून देण्याची सुविधा करण्यात आली आहे. हे तंत्रज्ञान राज्यातील जास्तीतजास्त शेतकऱ्यांपर्यंत लवकर पोहोचावे यासाठी सरकारने प्रत्येक जिल्ह्यासाठी काही उद्दिष्ट ठेवलेली आहेत.

मिळालेल्या माहीतीनुसार, ड्रोन (Drones) मध्ये एका वेळी 10 लिटरपर्यंत युरीया घेऊन शेतात सहजपणे फवारणी करम्याची क्षमता आहे. तसेच या ड्रोन तंत्रज्ञानामुळे (Drones Technology) शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात वोळ वाचणार असून एक महत्वाची बाब म्हणजे या फवारणीचे मानवी शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. तसेच, एक शेतकरी ड्रोनच्या (Drones) साहाय्याने एका दिवसात 20 ते 25 एकर शेतीवर सहज कीटकनाशक किंवा नॅनो युरीया फवारणी करू शकणार आहे.