Milk Rate | दूध उत्पादकांना दिलासा; दुधाच्या दरात वाढ


Milk Rate | शेतीला जोड व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी हे दुग्ध व्यवसाय करतात. मात्र, यंदा पावसामुळे शेतीसोबतच दुग्ध व्यवसाय आणि पशू पालकांनाही फटका बसला आहे. एकीकडे दुधाचे दर पडलेले होते. तर, दुसरीकडे चाऱ्याचा तुटवडा यामुळे पशू पालकही संकटात सापडले होते. दरम्यान, दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून, आता दुधाचे दर वाढले आहे. (Milk Rate)

जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाने गाय आणि म्हशीच्या दुधाच्या किंमतीत प्रत्येकी २ रुपयांची वाढ केली असून, जिल्हा दूध संघाचे चेअरमन मंगेश चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली आहे. मंगेश चव्हाण म्हणाले की, “जागतिक बाजारपेठांमध्ये लोणी आणि दुधाच्या पावडरचे दर वाढविण्यात आले होते. त्यामुळे राज्यभरातील सर्वच दूध संघांनी दुधाच्या किंमतींमध्ये घट केली होती. यावेळी जळगाव जिल्हा दूध संघाने गायीच्या दुधाचा दर हा २७ रुपये आणि म्हशीच्या दुधाचा दर हा ४४ रुपये केला होता.

Milk Rate | …नाहीतर किसान सभा करणार आंदोलन! सरकारला इशारा

Milk Rate | असे आहेत नवीन दर..

दरम्यान, आता जिल्हा दूध संघाकडून काढण्यात आलेल्या निविदेत लोणी आणि दूध पावडरला चांगला भाव मिळाल्याने जिल्हा दूध संघाकडून गाय व म्हशीच्या दुधाच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर आता गायीच्या दुधाचा दर हा २९ रुपये ४० पैसे आणि म्हशीच्या दुधाचा दर हा ४६ रुपये ६० पैसे इतका असणार आहे. राज्यातील इतर दूध संघांच्या तुलनेत चांगला दर जळगाव जिल्हा दूध संघ देत असल्याचेही यावेळी मंगेश चव्हाण म्हणाले. (Milk Rate)

Milk Rate | दूध प्रश्नावर तोडगा निघणार का? आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार बैठक