Rabbi MSP | केंद्र सरकारकडून रब्बीचा हमीभाव जाहीर; मागच्या वर्षीच्या तुलनेत किती टक्क्यांनी मिळतेय वाढ?

Rabbi MSP | 2025-26 च्या रब्बी हंगामातील पिकांना किमान आधारभूत किमतीमध्ये म्हणजेच हमीभावात केंद्र सरकारने वाढ केली असून त्यानुसार, गावासाठी 150 रुपये, मसुरीसाठी 275 रुपये तर हरभऱ्यासाठी 210 रुपयांची वाढ जाहीर करण्यात आली आहे. 2025-26 रब्बी गाव्हासाठी प्रतिक्विंटल 2,425 रुपये, मसूरसाठी प्रतिक्विंटल 6 हजार 700 रुपये तर हरभऱ्यासाठी प्रतिक्विंटल 5 हजार 650 रुपये हमीभाव जाहीर … Read more

Government Scheme | केंद्र सरकारकडून ‘या’ दोन कृषी योजनांना मंजुरी

Government Scheme | देशातील कृषी क्षेत्राच्या विकासासह शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवत, अनेक योजना राबविल्या जात आहेत. या संदर्भात केंद्र सरकारने ‘पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजना’ आणि ‘कृषी उन्नती योजना’ मंजूर केली आहे. गुरुवार 3 ऑक्टोबर रोजी कृषी आणि कल्याण मंत्रालयांतर्गत चालवल्या जाणाऱ्या सर्व केंद्र पुरस्कृत योजनांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दोन व्यापक योजनांमध्ये विलीनीकरण … Read more

Weather Update | मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासात खंड; आज पावसाचा जोर ओसरणार

Weather Update | राज्यामध्ये सुरू असलेल्या परतीच्या पावसाचा जोर आजपासून निवळण्याची शक्यता असून आज शनिवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मध्यप्रदेश आणि आसपासच्या परिसरावर समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. ज्यामुळे दक्षिण गुजरात पासून वायव्य बिहार … Read more

Ajit Pawar | लोकसभेला दिलेल्या झटक्याने पार कंबर मोडली; माफी मागत कांदा उत्पादकांना दादांचा वादा

Ajit Pawar

नाशिक : लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. विशेषत: कांदा पट्ट्यात महायुतीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. कांदा निर्यात बंदी, अतिरिक्त कांदा निर्यात शुल्क, कांदा उत्पादकांच्या (Onion Farmers) बाबतीतील धरसोडीचे धोरण यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच नाराज होते आणि त्यांची आपली नाराजी लोकसभा निवडणुकीत मतपेटीत दाखवून दिली. याची कबुली महायुतीचे पराभूत उमेदवार, देवेंद्र फडणवीस (Devendra … Read more

Budget 2024 | 1.52 लाख कोटींपैकी कांदा उत्पादकांसाठी काहीच नाही; शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

Budget 2024

Budget 2024 | भाजपप्रणित एनडीएने देशात तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले असले तरी यंदा सत्तास्थापनेसाठी त्यांची चांगलीच दमछाक झाली. 2014च्या लोकसभा निवडणुकीत 336, 2019च्या लोकसभा निवडणुकीत 353 जागा मिळवणाऱ्या आणि यंदा 400 पारचा ‘कॉन्फिडन्स’ बाळगणाऱ्या एनडीएला या लोकसभा निवडणुकीत 240 जागांवरच समाधान मानावे लागले. यामागे शेतकरी आंदोलन, शेतकरीविरोधी धोरण, शेतकरी वर्गात असलेली नाराजी हे महत्त्वाचे कारण … Read more

Union Budget 2024 | अर्थमंत्र्यांकडून घोषणांचा पाऊस; अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय ..?

Union Budget 2024

Union Budget 2024 :  लोकसभा निवडणुकीत कृषीविषयक धोरणांचा मोठा फटका बसल्यानंतर आता तिसऱ्या कार्यकाळात भाजपप्रणित एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पाची सर्वांनाच प्रतीक्षा होती. तर, या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांसाठी काय काय निर्णय घेतले जातात. याबबात उत्सुकता होती. दरम्यान, अर्थसंकल्पात कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची भरीव तरतूद करण्यात आली असून, घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे.  … Read more

Union Budget 2024 | शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात काय हवं..?; शेतकरी नेत्यांच्या मागण्या काय..?

Union Budget 2024

Union Budget 2024 :  आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरु झाले असून, उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Finance Minister Nirmala Sitharaman) या मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचे पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेची पसंती कमी मिळाल्याचे आणि शेतकरी वर्गात मोदी सरकारविषयी मोठी नाराजी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही नाराजी दूर करण्यासाठी अर्थसंकल्पात शेतकरी, सर्वसामान्यांसाठी, महागाई … Read more

Corn Crop | मका पीकाला पावसाचा फटका; देवळा तालुक्यातील मका क्षेत्राची केंद्रीय पथकाकडून पाहणी

Corn Crop

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसू लागल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवार (दि. ११) रोजी देवळा येथील शिवारातील मका पिकाची पाहणी केंद्रीय एकीकृत नाशीजीव प्रबंधन केंद्र, नाशिक आणि कृषी व किसान कल्याण मंत्रालय भारत सरकारच्या अधिकारी वर्गाने केली. पाऊस कमी असल्याने या अळीचा प्रादुर्भाव असून त्यावर काय आणि कशी उपाययोजना करावी … Read more

Loan Waiver | तिकडे काँग्रेस सरकार कर्जमाफी करतंय; इकडे महाराष्ट्र सरकार भाव पाडतंय..?

Loan Waiver

Loan Waiver | गेल्या काही निवडणुकांपासून मरगळलेल्या काँग्रेसला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा नवचैतन्य मिळाले आहे. देशात बहुतेक राज्यात भाजपची सत्ता असली तरी गेल्या वर्षी कर्नाटक आणि तेलंगणामध्ये सत्ता मिळवण्यात काँग्रेसला यश आले. दरम्यान, यावेळी तेलंगणा (Telangana) विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जाहिरनाम्यात शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर तेलंगणाच्या जनतेने काँग्रेसवर विश्वास दाखवला आणि तेलंगणामध्ये … Read more

Ladli Bahna Yojana | विधानसभेपूर्वी राज्य सरकार राबवणार महिलांसाठी ‘ही’ भन्नाट योजना..?

Ladli Bahna Yojana

Ladli Bahna Yojana : नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली असून, आता येत्या ३ ते ४ महिन्यांतच विधानसभा निवडणुकीचेही बिगुल वाजण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकार अनेकविध योजना राबवत असून, यातच आता राज्यातील गरीब महिलांना मदत म्हणून सरकार ‘लाडली बहना योजना’ (Ladli Bahna Yojana) सुरू करणार आहे.  हो योजना मध्य प्रदेश सरकार चालवत असून, … Read more