Weather Update | मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासात खंड; आज पावसाचा जोर ओसरणार


Weather Update | राज्यामध्ये सुरू असलेल्या परतीच्या पावसाचा जोर आजपासून निवळण्याची शक्यता असून आज शनिवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मध्यप्रदेश आणि आसपासच्या परिसरावर समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. ज्यामुळे दक्षिण गुजरात पासून वायव्य बिहार पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तेव्हा पावसाळी व ढगाळ हवामानामुळे राज्यातील उन्हाचा उकाडा कमी झाला असून शुक्रवारी सकाळपर्यंत 24 तासांमध्ये वर्धा येते राज्यातील उच्चांकी 32.6 तापमानाची नोंद झाली होती.

Weather News | चक्रीय वाऱ्यांमुळे आज ‘या’ जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ जाहीर

आज या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जाहीर

तर आज उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून जळगाव सह विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वाजांसह पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यांमध्ये पावसाचा जोर कमी होणार असून सतत पडत असलेल्या पावसापासून थोडी उघडिप मिळणार आहे.

मॉन्सून पतीची गती थंडावली

यंदा ही नैऋत्य मौसमी वाऱ्यांनी उशिराने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यामुळे सोमवारी वायव्य राजस्थान आणि कच्छमधून पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला. मंगळवारी राजस्थान आणि गुजरातच्या आणखी काही भागांसह पंजाब आणि हरियाणाच्या काही भागातून मॉन्सून परतला त्यानंतर मात्र मॉन्सून परतीची वाटचाल थबकली असून फिरोजपुर, सिरसा, चुरू, अजमेर, माउंट आबू, दिसा, सुरेंद्रनगर ते जुनागड पर्यंत मॉन्सूनची परतीची सीमा कायम आहे.

Weather Update | राज्यात आजही मुसळधार पावसाचा इशारा; पालघर, नाशिक जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर

आज या भागात पावसाचा येलो अलर्ट

तर आज नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून जळगाव बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांना वादळी वारे आणि विजांसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.