Onion Rate | कांद्याचे दर चांगलेच घसरले; ग्राहक खुश मात्र कांदा उत्पादकांच्या वाटेला अश्रू


Onion Rate | नाशिक जिल्ह्यासह संपु्र्ण राज्यात सध्या कांदा प्रश्नावरून वातावरण चांगलचं तापलं असून केंद्र सरकारने केलेल्या कांद्याच्या निर्यातबंदी वर नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान, केंद्राच्या या निर्णयावर शेतकऱ्यांसह विविध शेतकरी आक्रमक झालेल्या आहेत. सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या या निर्णयानंतर नाशिकमधील बाजारसमित्यांमध्ये कांद्याच्या दरात घट झाली असून यामुळे सर्वसामान्यांना जरी दिलासा मिळाला असला मात्र तरी दुसरीकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या निर्णयाने मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

कांद्याचे वाढलेले दर पाहता सर्वसामान्यांना कांदा स्वस्त दरात उपलब्ध व्हावा यासाठी 7 डिसेंबर रोजी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती आणि यानंतर घाऊक बाजारात कांद्याचे भाव जवळपास 50 टक्क्यांनी घसरले. याचा सर्वसामान्यांना जरी फायदा झाला असला तरी मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान झेलावं लागत आहे. बाजारसमितीच्या आकडेवारीनुसार, लासलगाव बाजारसमितीमध्ये कांद्याची सरासरी किंमत कांदा निर्यातबंदीच्या आधी 39 ते 40 रुपये प्रति किलो इतकी होती मात्र आता कांद्याची किंमत 20 ते 21 रुपये प्रति किलो आहे. दरम्यान आता कांद्याचे दर अगदी पुर्वीपेक्षा निम्यावर आले आहेत.

Onion Rate | नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक

यंदा जिल्ह्यात आधी दुष्काळ त्यांनतर अवकाळी आणि गारपीट यामुळे कांदा उत्पादकांवर अक्षरशः रडण्याची वेळ आणली आणि आता त्यात भर म्हणून कि काय केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी करून कांदा उत्पादकांना अगदी मेटाकुटीला आणलं आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की, कांदा पिक हे दुष्काळग्रस्त लोकांचं पिक आहे कारण ज्याच्याकडे मुभलक पाणी आहे तो द्राक्ष, ऊस आणि डाळिंब अशी पिकं घेतो.

मुळात दुष्काळाशी संघर्ष करत कांदा उत्पादक शेतकरी कांदा पिकवतो त्यातही सरकार वारंवार असे घाव घालत असते. वर्षानुवर्षे फक्त अधिवेशनं होत राहतात मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काहीच केले जात नाही. आता कांदा उत्पादकांच्या मतदारसंघातील जे आमदार, खासदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत ते देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काहीच आवाज उठवत नाही अशी तक्रार नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मांडली आहेत.

Onion Rate | कांदा निर्यातबंदीनंतर कांद्याची सरासरी किंमत 47 टक्क्यांनी घसरण

भारतीतील सर्वात कांद्याची मोठी मानली जाणारी बाजारपेठ म्हणजे लासलगाव बाजार समिती. या बाजारसमितीत  6 डिसेंबर रोजी लाल कांद्याची सरासरी किंमत 39.50 रुपये प्रति किलो होती तर सर्वाधिक किंमत 45 रुपये प्रति किलो होती. मात्र, सध्या कांद्याच्या दरात घसरण झाली असून सध्या प्रतिकिलो कांद्याला 21 ते  25 रुपयांचा बाजारभाव मिळतो आहे.

केंद्राने केलेल्या कांदा निर्यातबंदीनंतर कांद्याची सरासरी किंमत 47 टक्क्यांनी कमी झाली असून नाशिकच्या बाजारांमधील कांद्याच्या पुरवठ्याच्या आकडेवारीवरुन एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. ती म्हणजे आता खरीप कांद्याची आवक सरकारच्या अपेक्षेपेक्षा जास्त होत असून लासलगाव बाजारात या महिन्यात 19 डिसेंबरपर्यंत 3.66 लाख टन लाल कांद्याची आवक झालेली आहे. तसेच संपूर्ण डिसेंबर 2022 मध्ये 3.69 लाख टन इतकी कांद्याची एकूण आवक झाली होती.