Onion News | नाशिकमधल्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर टेकले; असे आहेत दर..?


Onion News | नाशिकमध्ये कुठल्या बाजार समितीत कसे आहेत कांद्याचे दर..?; वाचा सविस्तर

Onion News | केंद्र सरकारने लागू केलेल्या कांदा निर्यातबंदीमुळे नाशिकसह सर्वच प्रमुख बाजारपेठांमध्ये कांद्यांच्या दरात घसरण होत असून, यामुळे आता कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीनंतर कांद्याच्या दरात आणखीनच घसरण झाली आहे. आता लाल कांद्याची आवक वाढली आहे. यामुळे कांद्याचे दर आणखीच खाली घसरत आहेत. जाणून घेऊयात कसे आहेत कांद्याचे दर…

Onion News | कोणत्या बाजार समितीत कसे आहेत दर..?

आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ असलेल्या लासलगाव-विंचूर बाजार समितीत लाल कांद्याला सरासरी ११०० रुपये प्रति क्विंटल असा भाव आहे. येवला बाजार समितीमध्ये किमान ९०० रुपये प्रतिक्विंटल भाव आहे. चांदवड बाजार समितीमध्ये लाल कांद्याची दहा हजार क्विंटल आवक झाली असून, तर येथे किमान भाव हा ८०४ रुपये असा आहे. पिंपळगाव बसवंत बाजार समितीत दहा हजार क्विंटल कांद्यांची आवक झाली असून, कांद्याला किमान ४०० रुपये भाव मिळत आहे. सर्वात कमी म्हणजेच मंगळवेढा बाजार समितीत किमान १५० रुपये प्रतिक्विंटल असा भाव कांद्याला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांवर आता अक्षरशः रडण्याची वेळ आली आहे.(Onion News)

Onion Export | …नाहीतर गांजा लागवडीची परवानगी द्या; संतप्त शेतकऱ्यांची मागणी

एकीकडे उन्हाळ कांद्याची लागवड तर…

बाजार समित्यामध्ये त्यात कांदा लिलाव पार पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारभाव सातत्याने घसरत असून, हमी भाव मिळत नसल्याने आज देखील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर निराशाच बघायला मिळाली. सरकारच्या निर्यातबंदीच्या निर्णयानंतर कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत आहे. एकीकडे शेतकऱ्यांची उन्हाळा कांद्यांची लागवड सुरू आहे. मात्र, दुसरीकडे कांद्याला चांगला भाव मिळत नाहीये. कांदा बाजारभावात सातत्याने घसरण झाल्याने शेतकऱ्यांवर अक्षरशः डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे. तर राज्य शासनाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम कक्षाने आजचा हा कांद्याचा भाव जाहीर केला आहे.(Onion News)

Onion News | जगभरात ‘या’ कांद्याची मागणी वाढली…

निर्यात बंदीच्या निर्णयापूर्वी चार हजारांवर असणारे कांद्याचे भाव हे आता थेट हजार रुपयांवर येऊन टेकले आहेत. तर नाशिक जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला हजार ते बाराशे रुपये असा दर मिळत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. कांदा पिकातून उत्पादन आता खर्चही निघने कठीण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. यामुळे नाशिकमधील शेतकरी प्रचंड आक्रमक झाले असून, लवकरात लवकर कांद्यावर लादलेली निर्यात बंदी उठवण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.(Onion News)