Farmer Scheme | बागायतदारांसाठी सरकारची नवी तरतूद…


Farmer Scheme | बागायतदारांसाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

Farmer Scheme | आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर का होईना, पण यावर्षी सरकार शेतकऱ्यांकडे विशेष लक्ष देणार आहे. त्यात बागायतदारांसाठी महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे. यानुसार आता बागायततदारांसाठी सरकारने तब्बल २२०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. वाचा याबाबत सविस्तर माहिती…

Farmer Scheme | बागायतदारांसाठी सरकारच्या ‘या’ तरतुदी..?

‘आत्मनिर्भर फलोत्पादन स्वच्छ वनस्पती’ अभियानासाठी सरकारने २,२०० कोटी रुपये दिले आहेत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने ‘आत्मनिर्भर फलोत्पादन स्वच्छ वनस्पती’ कार्यक्रम हा देशातील फलोत्पादक शेतकऱ्यांसाठी सुरु केला आहे. शेतकऱ्यांना बागायती पिकांच्या उत्कृष्ट लागवडीचे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने या कार्यक्रमाचा शुभारंभ केला आहे. यात रोगमुक्त बागायती पिकांचा देखील समावेश करण्यात आला आहे. (Farmer Scheme)

Farmer Scheme | या वर्षी सरकार शेतकऱ्यांना काय देणार..?

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या १ फेब्रुवारी २०२४ रोजी सलग सहावे अर्थसंकल्पीय भाषण सादर करणार आहेत. यात तरुण, महिला, शेतकरी आणि गरीब अशा चार प्रमुख गटांसाठी धोरणांवर केंद्र सरकार लक्ष केंद्रित करणार आहे. कृषी कर्जाचे लक्ष हे २२ लाख कोटी रुपयांवरून आता २५ लाख कोटी रुपये वाढण्याची शक्यता यात वर्तविण्यात आली आहे. आत्ताच्या सत्ताधारी पक्षातील भाजप सरकार हे हा १२ वा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तसेच, हे २०२४ वर्ष निवडणूक वर्ष असल्याने हा अर्थसंकल्प अंतरिम असेल. दरम्यान, २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर पूर्ण अर्थसंकल्प सादर होण्याची अपेक्षा आहे.

Farmer Issues | ऊस तोडणीला विलंब, शेतकरी संकटात

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, आर्थिक व्यवहार विभाग आणि आशियाई विकास बँक यांच्यात गेल्या ऑक्टोबरमध्ये वाटाघाटी करण्यात आली होती. शेतकरी कल्याण विभागाच्या प्रस्तावास आर्थिक व्यवहार विभागाने (DEA) तसेच आशियाई विकास बँकेकडून मदत मिळवण्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे. तसेच यात, सात पिकांसाठी ICAR संस्थांमध्ये स्वच्छ वनस्पती केंद्रे स्थापन करण्याचे लक्ष सरकारने ठेवले आहे. दरम्यान, या प्रकल्पासाठी ९८ दशलक्ष डॉलर कर्ज सुरक्षित करण्याचे सरकारचे उदिष्ट आहे.(Farmer Scheme)