Onion News | अतिरेक्यांप्रमाणे सरकारचे शेतकऱ्यांवर सर्जिकल स्ट्राईक


Onion News | नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा बेमुदत कांदा लिलाव बंदचा निर्णय घेण्यात आलेला असून चांदवड येथील व्यापाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. जोपर्यंत कांदा निर्यातीसंदर्भात तोडगा निघत नाही तोपर्यंत कांदा लिलाव बंद असेल असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलेला असून केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातलेली आहे. 31 मार्च 2024 पर्यंत ही बंदी घालण्यात आलेली आहे. यामुळे शेतकरी आणि व्यापारी वर्गात नाराजीचे सूर उमटताना दिसत आहे. मनमाड आणि लासलगाव बाजासामिती मध्ये कांदा लिलाव बंद करण्यात आलेला आहे. या कांदा निर्यात बंदीमुळे आज अचानक कांदा export बंद झाल्याच चित्र दिसून येत आहे.

Breaking News | नाशिक जिल्ह्यात पुन्हा बेमुदत कांदा लिलाव बंदचा निर्णय

सरकार पाकिस्तानच्या अतिरेक्यांवर सर्जिकल स्ट्राईक करते त्याप्रमाणे सरकार शेतकऱ्यांच्या मानेवर पाय देत आहे. यापूर्वीच शेतकरी अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे प्रचंड नुकसानीला सामोरं जावं लागलं होतं. कांदा उत्पादक शेतकरी अगदी मेटाकुटीला आलेले असताना सरकार अशा पद्धतीने निर्णय घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी भाग पाडत आहे.

अवकाळी, गारपीट आणि त्यापूर्वी पाणी प्रश्न या सगळ्यातून शेतकऱ्यांनी कसाबसा मार्ग काढला मात्र आता पुन्हा एकदा सरकारने कांदा निर्यात बंदीमध्ये वाढ करून कांदा उत्पादकांना पुन्हा एकदा अडचणीत आणलेलं आहे. सरकारने शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करायला हवं मात्र सरकार शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडत आहे.

Onion News | कांदा निर्यातबंदीवरून विधानसभेत विरोधकांचा राज्य सरकारला सवाल

राज्यात सरकार आहे का? असा देखील सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. सरकार शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेऊन फक्त सरकार फक्त भांडवल जमा करण्याचे काम करतंय. कार्यक्रमासाठी खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी कामं करा- शिवाजी पवार (कांदा उत्पादक शेतकरी)