Mobile Offer | फिचर्स iPhone चे.. किंमत स्मार्टफोनची; कोणता आहे हा फोन?


Mobile Offer | आजकाल तरुणाईत फोन म्हणजे जीव..अशी परिस्थिती उद्भवलेली पहायला मिळत आहे. त्यातच सध्या iPhone घेण्याचे अनेक जण स्वप्न बघत असतात मात्र बजेटमध्ये नसल्यामुळे आयफोन घेतला जात नाही. आता आयफोन नाहीतर आयफोन सारखे फिचर असणारा स्मार्टफोन बाजारात आलेला असून हा फोन बजेटमध्ये म्हणजेच अगदी सहा हजारापर्यंतच मिळणार आहे.

यामुळे आयफोनचे फिचर्स बजेट असलेल्या फोनमध्ये वापरता येऊ शकणार आहे. Infinix कंपनीने हा फोन लॉन्च केला असून Infinix Smart 8 HD मध्ये अनेक फिचर्स उपलब्ध आहेत. त्यात 90Hz रिफ्रेश रेट वाली स्क्रीन मिळणार आहे. स्टँडर्ड प्रोसेसर, मॅजिक रिंग, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर या सारखे आयफोनमधील फिचर्स या स्मार्टफोनमध्ये दिलेले आहेत तसेच हा फोन तीन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असणार आहे.

या फोनमधील फिचर्स काय?

स्मार्टफोन सिंगल कॉन्फिग्रेशन 3GB RAM + 64GB storage असून यामध्ये पिल शेप्ड मॅजिक रिंगचे फिचर दिलेले असून त्यामुळे एनिमेशन आणि नोटिफिकेशन शो होत असतो. या स्मार्टफोनमध्ये बॅटरी जबरदस्त असून 5000mAh ची बॅटरी आहे. या स्मार्टफोनची किंमत सहा हजाराच्या आत असून हा स्मार्टफोन केवळ 5,669 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. Infinix Smart 8 HD फोन 10 टक्के डिस्काउंटवर Axis Bank कार्डवर उपलब्ध असणार आहे.

स्मार्टफोनमध्ये अ‍ॅपलसारखे कोणते फिचर्स ?

अ‍ॅपल फोनमध्ये असणारे डायनॉमिक आयलँडसारखे नोटिफिकेशनयामध्ये दिले असून यामध्ये बॅकग्राउंड कॉल, लो-बॅटरी रिमाइंडर आणि इतर नोटीफीकेशन्स मिळणार आहेत. त्यामध्ये octa-core Unisoc T606 प्रोसेसर दिले असून 3GB RAM आणि 64GB स्टोरेज असणारा हा फोन मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून 2TB पर्यंत स्टोरेज करता येणार आहेत.

या स्मार्टफोनसारखे डुअल रिअर कॅमेरा सेटअप दिलेला असून यामध्ये मेन लेन्स 13MP तर फ्रंट 8MPचा सेल्फी कॅमेरा आहे. त्यामध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलेला आहे. डुअल सिम सपोर्ट असणारा Infinix Smart 8 HD स्मार्टफोन Android 13 (Go Edition) वर बेस्ड XOS 13 वर काम करत असतो. 6.6-inch चा HD+ डिस्प्ले यामध्ये दिलेले आहेत. Infinix Smart 7 HD कंपनीने यंदाच्या वर्षी एप्रिल महिन्यात लॉन्च केला होता आणि त्याची किंमत 5,999 रुपये होती. तसेच 2GB RAM + 64GB स्टोरेज त्यात होते आणि त्याचे पुढचे व्हर्जन आणखी कमी किंमतीत आलेले आहे.