PM Kisan Yojna | योजनेचा लाभ घेण्यासाठी मोबाईलवरच करा ई-केवायसी पुर्ण


PM Kisan Yojna | भारताच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा भाग म्हणजे कृषी क्षेत्र असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या असून या योजनांमध्ये प्रधानमंत्री किसान निधी योजना (PM-Kisan Samman Nidhi Yojna) ही योजना अत्यंत महत्वाची आहे.

या योजनेंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी 6000 रुपये देेशातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. या योजनेची रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जोण्यात येते. देशातील अल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान निधी योजना (PM-Kisan Samman Nidhi Yojna) सुरु केलेली आहे. दरम्यान, कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी अलीकडेच प्रधानमंत्री किसान निधी योजनेच्या कामाचा आढावा घेतला आहे.

केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान निधी योजनेच्या ई-केवायसीसाठी गेल्या सहा डिसेंबरपासून राज्यात विशेष मोहीम सुरू केली असून राज्यातील चार लाख शेतकऱ्यांची ‘ई-केवायसी’ अद्यापही झाली नसल्याची माहीती आता समोर आली आहे. त्यामुळे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कृषी विभागाने चांगलीच तयारी सपरू केल्याचं दिसून येत आहे.

पीएम-किसान योजनेचा सोळाव्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट बघत असून या योजनेच्या ई-केवायसीसाठी गेल्या सहा डिसेंबरपासून राज्यात विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. यातच, ही मोहीम येत्या १५ जानेवारीला समाप्त होणार असून योजनेचा लाभ मिळण्यासाठी जमिनीचा तपशील अद्ययावत हवा, बँक खाते आधार संलग्न तसेच ई-केवायसी पुर्ण हवी अशा तीन अटी सक्तीच्या करण्यात आलेल्या आहेत.

PM Kisan Yojna | आपल्या मोबाईलवर करा ई-केवायसी पुर्ण

  • या योजनेची के-वायसी पुर्ण करण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये PMKISAN GoI – Apps on Google Play या लिंकवर क्लिक केल्यानंतर ‘पीएमकिसान-जीओआय’ हे उपयोजन (अॅप) डाउनलोड करा.
  • यानंतर तेथे आपला आधारकार्ड क्रमांक आणि भ्रमणध्वनी क्रमांक टाकावा.
  • ओटीपी क्रमांक टाकून बेनिफिशरी स्टेस्टस या रकान्यात माहिती भरायची आहे.
  • यानंतर डॅशबोर्ड पान उघडल्यानंतर खाली ई-केवायसीसाठी ‘येथे क्लिक करा’ अशा निळ्या अक्षरातील ओळीवर क्लिक करावे.