Nashik | बोगस बियाण्याने शेतकरी हतबल; सर्वाधिक तक्रार जिल्ह्यात


Nashik | कांदाप्रश्नी नाशिक जिल्ह्यातील शेतकरी सध्या फारच आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. त्यातच नाशिक जिल्ह्यात बियाणांची उगवण झाली नसल्याच्या तक्रारी खरीप हंगामातदेखील अनेक शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत. यामध्ये सोयाबीन बियाणांबाबतच्या तक्रारींचाही समावेश आहे. शेतकऱ्यांना फसवण्यात आले जून ते नोव्हेंबर अखेर जिल्ह्यात 3 गुन्हे दाखल झालेले आहेत. परंतु वाढत्या बोगस बियाणांच्या तक्रारीमुळे शेतकऱ्यांना नाहक आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते आहे.

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून बोगस बियाणांची मालिका दिवेसंदिवस समोर येते आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. दरवर्षी खरीपासाठी शेकडो क्विंटल बियाणे, खतांची आवश्यकता असते आणि त्यातच पेरणीसाठी ऐनवेळी धावपळ होऊ नये, म्हणून शेतकरी अगोदरपासूनच बियाणे व खंताची जुळवाजुळव करतात. मात्र अनेकवेळा बियाणांची उगवण होत नसल्याने पैसा तर जातोच मात्र उलट पुन्हा बियाणे खरेदीसाठी धावपळ करावी लागते. खरीप हंगामातदेखील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या असून यात एकाही कंपनी अथवा विक्रेत्यावर गुन्हा दाखल झालेला नाही.

योग्य पिक उगवण्यासाठी पेरणीनंतर अपेक्षित पाऊस झाल्यास बियाणे उगवण चांगली होण्याची शक्यता दाट असते आणि अन्यथा नुकसानच होऊ शकते. तर शेतकरी बच्चू टेकवाडे असं म्हणाले आहेत की, मी स्वतः भाजीपाला आणि धान्य उत्पादक शेतकरी असून मागील वर्षी खरिपात बियाणांची उगवण योग्य न झाल्याने पीकच आले नाही. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली तसेच उगवण क्षमता कमी असलेल्या बियाणे उत्पादक कंपनीविरुद्ध कार्यवाही करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी आमची मागणी आहे.