Milk News | या नव्या जुगाडमुळे आता गायी देणार जास्त दूध


Milk News | एका प्रयोगामुळे गायींचे दूध उत्पादन हे ४० टक्क्यांनी वाढले आहे.

Milk News | सध्याच्या काळात तंत्रज्ञान हे वेगाने विकसित होत आहे. त्यामुळे आता काहीच अशक्य राहिले नाही. प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा व्याप हा वाढत चालला असून, तितक्याच वेगाने जग ते स्वीकारतही आहेत. दरम्यान, असाच एक अभिनव प्रयोग रशियामध्ये सुरु असून, ‘रशियन कृषी विभाग’ गायींचे दूध उत्पादन वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करत आहेत. ‘VR ग्लास’ हे तंत्रज्ञान सध्या तरुण वर्गात प्रचंड लोकप्रिय झाले आहे. यामुळे तरुण वर्गाला मनोरंजनाचा आस्वाद हा अधिक चांगल्या प्रकारे घेता येतो. मात्र, आता या ग्लासेसचा वापर हा गायींच्या दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी करता येणार आहे. रशियन कृषी विभागाने या आगळ्यावेगळ्या प्रयोगाद्वारे दुग्ध उत्पादन वाढल्याचा दावा केला आहे. काय आहे हा प्रयोग? (Milk News) वाचा सविस्तर…

Milk Rate | …नाहीतर किसान सभा करणार आंदोलन! सरकारला इशारा

Milk News | कसे काम करते VR ग्लास

MindSet H2 या संबंधित युझरने या संबंधित एक व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यानुसार, या गायींच्या डोळ्यांवर २४ तासांसाठी ‘VR ग्लास’ लावला जातो. या VR ग्लासद्वारे गायींना हिरवे गवत, मैदानं यांचा व्हिडिओ दाखविला जातो. त्यामुळे या गायींना असा भ्रम होतो की, त्या खुल्या मैदानात आहेत किंवा आजूबाजूला हिरवे गवत आहे. आणि यामुळे त्या गायींचा मूड चांगला होतो. मूड चांगला झाल्यामुळे गाय जास्त दूध देते. एकूण गायींची दूध देण्याची क्षमता वाढते.(Milk News)

कसा लागला शोध..?

रशिया या देशात नेहमीच थंड वातावरण असते. त्यामुळे तिकडे सगळीकडे बर्फच दिसतो. एकतर, गाय जास्त उष्ण वातावरण किंवा थंड वातावरण सहन करु शकत नाही. त्याचमुळे हा जुगाड करण्यात आल आहे. त्यामुळे त्यांना गवत किंवा खुली मैदाने दिसतात. तसेच त्याचा परिणाम दुधाच्या वाढीवर देखील दिसून आला आहे. आपल्याकडे हे तंत्रज्ञान आपण उन्हाळ्यात वापरू शकतो.

Milk Rate | दूध प्रश्नावर तोडगा निघणार का? आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार बैठक

MindSet H2 या नावाच्या एका युझरने या संबंधित एक व्हिडिओ अपलोड केला असून, त्यात त्याने गायींच्या डोळ्यावर VR ग्लास बसविले आहेत. दरम्यान, या व्हिडिओला आतापर्यंत १३ लाख लाईक्स व 5 हजार कमेंट्स आलेल्या आहेत. मात्र, अनेक जणांना यावर विश्वास बसत नसून, त्यांना वाटत आहे की एक व्हीआर ग्लास लावल्यावर गायीची दूध देण्याची क्षमता कशी वाढू शकते?. हे जर तुम्ही तुमच्या शेतकरी किंवा पशुपालक असलेल्या व्यक्तीला संगीतले तर, ते नक्कीच दुर्लक्ष करतील. मात्र, रशिया कृषी विभागाने याबाबत दावा केला आहे. (Milk News)