Tur Dal | बळीराजा सुखावला..; ‘या’ पीकाचे दर १० हजारांपार


Tur Dal | शेतकऱ्यांना ‘या’ पीकाने दिलासा दिला असून, पीकाचे भाव १० हजारांपार पोहोचले हाते.

 Tur Dal | यावर्षी पावसाने शेतकऱ्यांचा हिरमोड केल्यामुळे पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. जेव्हा पीक असते. तेव्हा दर खाली टेकतात आणि पीक नसले की दर वाढतात. दरम्यान, आता काही पिकांचे दर वाढले असून यामुळे शेतकरी काहीअंशी हा होईनात पण सुखावले आहेत. दरम्यान, आता बाजारात तुरीची मागणी वाढली आहे. कापूस व सोयाबीन या पिकांचे दर कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना तुरीकडून थोड्याफार अपेक्षा होत्या. ‘अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती’मध्ये तुरीचे दर हे आता ‘दहा’ हजारांवर पोहोचले आहे. काल आणि आज तुरीला या हंगामातील सर्वाधिक उच्चांकी १० हजार २८५ रूपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे. आजही तुरीने १० हजारांचा भाव कायम ठेवला आहे. दरम्यान कापूस आणि सोयाबीनपासून निराश झालेल्या शेतकऱ्यांना तुरीमुळे दिलासा मिळाला.(Tur Dal)

Tur Dal | तुरीचे भाव १० हजारांपार

अकोला कृषी बाजार समितीत मागील वर्षातील १ डिंसेबर २०२३ रोजी तुरीला किमान भाव ८ हजार पासून कमाल भाव १० हजार इतका होता. त्यानंतर सातत्याने तुरीच्या दरात घसरण पाहायला मिळाली होती. या हंगामात काल तुरीला चांगला भाव मिळाला आहे. नवीन तूर दाखल झाली असून, मुहूर्ताच्या दिवशीच ९ हजारांवर भाव मिळत होता. आता नववर्षात तुरीच्या दरात वाढ होत असून, काल तुरीला उच्चांकी १० हजार २८५ रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे भाव मिळाला. दरम्यान आजही हे दर १० हजारांवर स्थिर आहेत. कमीत कमी ७ हजार ४०० पासून जास्तीत जास्त १० हजार २८५ रूपये असा क्विंटलमागे भाव मिळत आहे. तर सरासरी भाव ९ हजार रूपयांवर असून १ हजार ८५५ एवढी क्विंटल इतकी तुरीची आवक झाली आहे.(Tur Dal)

Agriculture News | ऊस टंचाईमुळे राज्यभरात ऊसाची वाहतूक न करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

यामुळे तूर उत्पादन कमी

अकोल्यात तूरीच्या काढणीला सुरुवात झाली असून, या खरीप हंगामात पावसामुळे पेरणी लांबणीवर पडल्यामुळे आणि त्यातही कमी आपुस झाल्यामुळे खरीप हंगामात पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. तसेच तुरीचे पीक हे फुलधारणेत पिकाला असताना अवकाळीचाही फटका बसला. तसेच त्यानंतरच्या वातावरण आणि अळी, रोगांमुळे तुरीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे तूर उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. अकोलाच नाही तर, देशातील इतर बाजार समित्यांमध्येही तुरीला सरासरी उत्तम भाव मिळत आहे.

तुरीच्या बाजार भावात सध्या सुरू असलेली हीच तेजी जर, कायम राहिली तर येणाऱ्या काही दिवसात हे दर सहज ११ हजारांचा टप्पा ओलांडू शकतील, असा अंदाज अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात आला आहे. फ्रेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवसांत तुरीचे भाव १२ हजार रूपयांपर्यंतही जाऊ शकण्याचाही अंदाज आहे. सोयाबीन व कापसाच्या भावात झालेल्या घसरणीमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. मात्र, त्यांना तुरीकडून अपेक्षा होत्या. त्यांच्या या अपेक्षा तुरीने पूर्ण केल्या असून, आज तुरीला मिळालेल्या या उच्चांकी दराने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत केल्या आहेत. (Tur Dal)

Agriculture News | अमित शहांनी नॅनो युरिया-डीएपीबाबत केली मोठी घोषणा

असे आहेत मागील काही दिवसांचे तुरीचे भाव

२ जानेवारी २०२४ – किमान भाव – ७ हजार रू., कमाल भाव- ८,६८० रू.
६ जानेवारी २०२४ – किमान भाव – ६,८०० रू., कमाल भाव – ९,३२० रू.
१२ जानेवारी २०२४ – किमान भाव – ७,५०० रू., कमाल भाव – ९,३८० रू.
१७ जानेवारी २०२४ – किमान भाव – ६,८६० रू., कमाल भाव – ९,५६० रू.
२० जानेवारी २०२४ – किमान भाव – ७,४०० रू., कमाल भाव – १०,२८५ रू.