Crop Insurance | ‘या’ योजनेचा लाभ कसा घेणार..?; वाचा सविस्तर


Crop Insurance | ‘प्रधानमंत्री पीक विमा’ योजना नेमकी आहे तरी काय? वाचा सविस्तर

Crop Insurance |  आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरीम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाकडून सामान्यांना फार अपेक्षा होत्या. मात्र, तितके काही झाले नसल्याने नागरिकांचा होरमोड झाला. या अर्थसंकल्पात कांदा उत्पादकांना केंद्राने कांद्यावर लावलेली निर्यात बंदी हटवण्याची अपेक्षा होती. मात्र, तसे काहीच झाले नाही. पण याव्यतिरिक्त काही तरतुदी शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या आहेत. तसेच यावेळी ‘प्रधानमंत्री पीक विमा’ या योजनेचा आतापर्यंत ४ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळाल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. ते ही ‘प्रधानमंत्री पीक विमा‘ योजना नेमकी आहे तरी काय? आणि याचा शेतकऱ्यांना कसा लाभ घेता येईल? ते या वृत्तात बघूयात…

बहुतांश वेळेस तोंडाशी आलेला घास हा अतिवृष्टी, गारपीट,दुष्काळ, अवकाळी पाऊस, कीटकांचा प्रादुर्भाव अशा काही नैसर्गिक आपत्तींमुळे हिरावला जातो. या नुकसानीच्या काळात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी किंवा काही प्रमाणात आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. देशभरातील अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ घेत आहेत. सध्या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांना अनेक नैसर्गिक समस्यांना सामोरे जावे लागत असून, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सरकारने सुरु केलेली आहे.(Crop Insurance)

Farmer News | शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता; शेतमाल विक्रीसाठी नवी पद्धत

‘या’ वेळी मिळणार विमा संरक्षण

काही आस्मानी संकटांमुळे पेरणी किंवा कापणी उशीरा झाल्यास होणारे नुकसान, पीकाच्या पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या काळात नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पुर, भुसखलन, किड आणि रोग पडणे इत्यादींमुळे उत्पादनात होणारी घट, एखाद्या स्थानिक नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे होणारे नुकसान यामुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीस या योजने अंतर्गत विमा संरक्षण दिले जाते.  

Crop Insurance | १ रुपयात काढा ‘पीक विमा’

२०१६ च्या खरिप हंगामापासून महाराष्ट्रात ‘प्रधानमंत्री पीक विमा’ ही योजना राबवली जात आहे. आता महाराष्ट्र सरकारने या योजनेत मोठा बदल केला असून, या नवीन बदलांप्रमाणे सर्वसमावेशक पीक विमा योजना या पुढील ३ वर्षांसाठी राज्यात राबवण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार, आता शेतकरी फक्त १ रुपयात या पीक विम्यासाठी अर्ज करू शकणार आहेत.(Crop Insurance)

Crop News | राज्य सरकार खरेदी करणार ‘हे’ पिक

‘प्रधानमंत्री पीक विमा’ या योजनेच्या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना खरिप हंगामासाठी विमा हा संरक्षित रकमेच्या 2 टक्के, रबी हंगामासाठी १.५ टक्के तर, दोन्ही हंगामातील नगदी पिकांसाठी ५ टक्के हप्ता भरावा लागणार आहे. दरम्यान, ही रक्कम ७००, १०००, २००० प्रतिहेक्टर इतकी होती. आता शेतकरी केवळ १ रुपया भरुन या योजनेचा भाग होऊ शकणार आहेत. शेतकरी हप्त्याची उर्वरित पूर्ण रक्कम ही राज्य सरकार भरणार असून, कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक केलेली आहे. एवढेच नव्हे तर, भाडेतत्त्वार शेती करणारे शेतकऱ्यांनादेखील या योजनेसाठी अर्ज करत येणार आहे.

‘या’ पिकांना लागू होणार विमा

खरिप हंगामात भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भूईमूग, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस, खरिप कांदा या पिकांसाठी या योजनेद्वारे विमा संरक्षण हे लागू होणार आहे. तर रब्बी हंगामात गहू, रब्बी ज्वारी, हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भूईमूग, रब्बी कांदा या पिकांसाठीदेखील हे विमा संरक्षण लागू असणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पीक विमा योजनेच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकणार आहात किंवा CSC सेंटरवर जाऊनही अर्ज करू शकणार आहात.(Crop Insurance)