Milk Rate | दूध प्रश्नावर तोडगा निघणार का? आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार बैठक


Milk Rate | शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाकडे पाहिले जाते आणि असे असताना आता हा व्यवसाय करणे अवघड झालेलं आहे. दूध दरात मोठी घसरण झाली असून दुधाच्या दरात (Milk Price) मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांसहीत विविध शेतकरी संघटना आक्रमक झालेल्या आहेत. अनेक ठिकाणी शेतकरी आणि दुध उत्पादकांची आंदोलनं देखील सुरु आहेत. दरम्यान, दूध दराच्या मुद्यावरुन आज(दि. १४) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंत्रीमंडळाची महत्वाची बैठक होणार असून या बैठकीला रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांच्यासह दूध महासंघाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. 

सध्या कांदा आणि दूध दराच्या प्रश्नावरुन राज्यातील वातावरण चांगलच तापलं असून कारण सातत्याने दुधाचे दर कमी होत आहेत. या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आज (दि. १४) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंत्रीमंडळाची बैठक होत आहे. दुपारी चार वाजता ही बैठक होणार असल्याची माहिती रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी दिली असून या बैठकीला दूध महासंघाचे प्रतिनिधी देखील उपस्थित राहणार आहेत.

नेमक्या मागण्या काय?

  • राज्य सरकारने दुधाच्या बुकटीला अनुदान द्यावं.
  • दुधाचे दर ढासळल्यामुळे दूध उत्पादकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आणि त्यामुळं दूध दराची निश्चिती करावी.
  • शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान मिळावे जेणेकरुन जो तोटा सहन करावा लागतोय तो दूध उत्पादकांना करावा लागणार नाही.

आजच्या मुख्यमंत्री आणि दुध उत्पादकांच्या बैठकीत या प्रमुख तीन मागण्या करण्यात येणार असल्याची माहिती सदाभाऊ खोत यांनी दिलेली आहे. 

Milk Rate | दुधाला किमान 34 रुपये दर द्यावा 

दुधाला किमान 34 रुपये दर द्यावा या मागणीसाठी विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलने केली असताना तसेच अनेक ठिकाणी दुध ओतून देखील आंदोलने सुरु झालेली आहेत. या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सरकारने दुधाला किमान 34 रुपये भाव द्यावा असा शासन आदेश काढला मात्र सरकारचा हा शासनाचा आदेश खासगी आणि सहकारी दूध संघांनी धुडकावून लावलेला आहे. तर आजच्या बैठकीत काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असतं.