Farmers fraud | सावधान! बियाण्यांबाबत शेतकऱ्यांना फसवलं तर…


Farmers fraud | राज्यात खरीप व रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात पिकं घेतली जातात. यासाठी खते तसेच बियाणेही मोठ्या उपलब्ध करून देण्यात येतात. त्यामुळे खते तसेच बियाणांबाबत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊ नये, यासाठी कृषी खात्याची भरारी पथकंदेखील तयार केलेली असतात.

या भरारी पथकांची नजर ही संबंधित शेती उत्पादनाच्या विक्रेत्यावर असते. तसेच शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास ह्या विक्रेत्यांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई होते आणि संबंधित गुन्हा सिद्ध झाल्यास त्या विक्रेत्याला शिक्षादेखील होते. खरीप हंगाम हा सर्वांत मोठा हंगाम असतो. जवळपास तब्बल ३ लाख हेक्टर जमिनीवर हा हंगाम घेतला जातो. दरम्यान, ह्या हंगामात भात, बाजरी, सोयाबीन, भुईमूग इत्यादी पिकं हि प्रामुख्याने घेतली जातात.

दरम्यान, ह्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभाग हे विशेष नियोजन करत असते. तसेच खते तसेच बियाणांबाबत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी भरारी पथके तयार करण्यात येतात. या माध्यमातून शेतकऱ्यांची तक्रार आल्यास कारवाई करण्यात येते. दोषी कोणी आढळल्यास फौजदारी स्वरूपाची कारवाईही केली जाते.

तसेच संबंधित व्यापाऱ्यांच्या दुकानांचे निलंबन किंवा कायमस्वरूपी त्यांचे परवाने हे रद्ददेखील करण्यात येत आहे. यावर्षी खरिपाच्या हंगामात आतापर्यत सहा दुकानदारांवर कारवाई करण्यात आली होती. आता रब्बी हंगामाची देखील पेरणी सुरू आहे. अशावेळी बियाणांबाबत ह्या शेतकऱ्यांची तक्रार आल्यानंतर याबाबत कृषी विभागाकडून दखल घेतली जाते. तसेच संबंधित विक्रेत्यांना कृषी विभागाच्या कारवाईला सामोरे जावे लागते. दरम्यान, शेत बियाण्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांना फसवलंत तर, फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागेल.

प्रत्येक तालुक्यात एक पथक..

खरीप हंगामातच ह्या शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता हि जास्त असते. दरम्यान, यासाठी जिल्ह्यातील तब्बल ११ तालुक्यांत कृषी विभागाची भरारी पथके तयार आहेत. या भरारी पथकांची संबंधित बियाणे विक्रेत्यांवर नजर असते. तसेच फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची तक्रार आल्यास दुकानांची तपासणी होते. या भरारी पथकाचे अध्यक्ष हे तालुक्याचे कृषी अधिकारी हे असतात, तर इतर काही सदस्यदेखील असतात.

प्रत्येक जिल्हात स्वतंत्र पथक..

जिल्ह्याच्या कृषी विभागाकडून प्रत्येकि तालुक्याच्या स्तरावर पथके तयार असतात, तसेच प्रत्येक जिल्हा स्तरावरदेखील एक स्वतंत्र भरारी पथक कार्यरत असतात. हे पथकदेखील शेतकऱ्यांची फसवणूक होउ नाये याबाबत कटाक्ष असतात. दरम्यान, ह्या पथकात कृषीबरोबर इतरहि काही विभागांच्या सदस्यांचा समावेश असतो. हे पथकही याबाबत कारवाई करतात.

नेहमी पक्क्या बिलाचा आग्रह का करावा..

जास्तीच्या दराने खतांची विक्री, पॉसविना खते देणे, विक्रीचे रेकॉर्ड अद्ययावत न ठेवणे या आदी कारणामुळे कारवाई केली जाते. तसेच विक्रेत्यांकडून पॉसवर खत खरेदी करण्याचा आग्रह धरून पक्के बिल घ्यावे. त्याबरोबरच काही नामांकित कंपन्यांचेच खत खरेदी करावे, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात येत आहे.