Loksabha Election | शेतकऱ्यांनो..! ही निवडणूक निर्णायक; एकजूट दाखवणे गरजेचे…


Loksabha Election | आधीच निसर्ग कोपलेला असून, त्यात सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे बळीराजा मेटाकुटीला आला आहे. स्वतःच्या सत्तेची पोळी भाजण्यासाठी ऐन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कांद्याचे दर पाडण्यासाठी सरकारने आधी निर्यात शुल्क वाढवले ते कमी होते, की त्यानंतर थेट कांद्यावर निर्यात बंदी लादली. यामुळे जो कांदा शेतकऱ्यांना सुखाचे दिवस दाखवणार होता. तर, आता सरकारच्या या एका निर्णयामुळे शेतकऱ्यांना आज सणही साजरा करता येत नसल्याची वस्तुस्थिती कांदा उत्पादक पट्ट्यात आहे. (Loksabha Election)

सध्या हे प्रचारासाठी गावांमध्ये जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधाला सर्व खासदार, आमदारांना सामोरे जावे लागत आहे. आपले राजकीय हित साधणाऱ्या राजकारण्यांना शेतकऱ्यांच्या वेदना समजून घ्यायला वेळ नाही. जिल्ह्यातील काही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाले. मात्र, त्यांना अजून लाभ मिळेना. तर, काही तालुक्यांमध्ये दुष्काळ आहे. मात्र, तेथील आमदारांना शासन दरबारी तीव्रता मांडता न आल्याने हे शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी लेखणाऱ्या या सर्वच पक्षाच्या आमदार खासदारांना धूळ चारणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांचा वचक राहणार नाही, हे तितकेच खरे.

लोकप्रतिनिधींना आपली ताकद दाखवून देणे गरजेचे

दरम्यान, ही एकूण परिस्थिती पाहता. कदाचित हे लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांचे महत्त्व विसरले असतील. त्यामुळे या निवडणुकीत शेतकऱ्यांनी आपली एकजूट दाखवत या लोकप्रतिनिधींना आपली ताकद दाखवून देणे गरजेचे आहे. सध्याची परिस्थिती पहिली तर, एकाही पीकाला हमीभाव नाही. कांदा, द्राक्ष किंवा कापूस पट्टा असुदेत, सगळीकडे शेतकऱ्यांच्या व्यथा सारख्याच आहेत.

Loksabha Election | शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणारा एकही नाही

मात्र, शेतकऱ्यांसाठी सरकार दरबारी सत्ताधारी असो किंवा विरोधक कुठल्याही पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला नाही किंवा कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी तीव्र भूमिका घेतली नाही. त्यामुळे सध्या सत्तेचे हवा घेण्यात मशगूल असणाऱ्या या आमदार, खासदारांना त्यांची जागा दाखवणे गरजेचे असून, यासाठी आता शेतकऱ्यांना एकत्र यावे लागणार आहे. अन्यथा हेच लोकप्रतिनिधी पुन्हा निवडणून आले तर, पुन्हा पाच वर्ष याच परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे सत्तापालट करण्यासाठी ही निवडणूक शेतकऱ्यांसाठी निर्णायक असणार आहे. (Loksabha Election)

माळवाडीतील गावकऱ्यांप्रमाणे एकजूट दाखवणे गरजेचे 

गेल्या काही दिवसांपूर्वी देवळा तालुक्यातील माळवाडी या गावातील शेतकऱ्यांनी गावात बॅनर लावून प्रचारासाठी येणाऱ्यांना विरोध दर्शविला. गेली पाच वर्षे जे आमच्याकडे आले नाहीत. त्यांनी आता मतं मागण्यासाठीही येऊ नये. ज्यांना आमची गरज नाही. आम्हालाही त्यांची आगर्ज नाही. असे म्हणत या गावकऱ्यांनी आपली एकजूट दाखवत भूमिका मांडली. तशी एकजूट आणि भूमिका आता सर्व शेतकऱ्यांनी दाखवायला हवी. अन्यथा येणाऱ्या काळातही शेतकऱ्यांना असेच काहीसे दिवस पहावे लागतील.