Loksabha Election | सध्या राज्यासह देशात निवडणुकींचा मौसम असून, सर्व पक्षाचे बडे नेते हे आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे ही यंदाची ही लोकसभा निवडणूक निर्णायक असणार आहे. दरम्यान, यातच शेतकऱ्यांसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोठी घोषणा केली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या बळवंत वानखेडे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी येथे सभा घेतली. यावेळी शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेऊन राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांवर जणू आश्वासनं आणि ऑफर्सचा वर्षावच केला. (Loksabha Election)
Loksabha Election | जर काँग्रेस सत्तेत आले तर..
जर देशात काँग्रेसचे सरकार आले तर, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक क्रांतिकारी योजनांची अंमलबजावणी केली जाईल असे आश्वासन यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना दिले. ते म्हणाले की,”पंतप्रधान मोदी यांनी मागील 10 वर्षात शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही. पण जर काँग्रेस सत्तेत आले तर, आम्ही तुमचं कर्ज तातडीने माफ करु. याशिवाय, देशात कृषी आयोग स्थापन केले जाईल. या आयोगाच्या अंतर्गत जेव्हा कोणत्याही राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज पडेल. त्यावेळी हे आयोग सरकारकडे कर्जमाफी करण्याची शिफारस करेल. त्यामुळे केवळ एकदाच नव्हे तर अनेकदा शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकेल.
Kisan Credit Card | आता शेतकऱ्यांना १० मिनिटांत घरबसल्या विनातारण कर्ज मिळणार
उद्योगपतींचे कर्ज माफ होऊ शकते, तर शेतकऱ्यांचेही झाले पाहिजे
भारतात संपत्तीची कमी नाहीये. तुम्ही आपल्या देशातील अब्जाधीश असलेल्या उद्योगपतींकडे बघा, त्यांचं घर, त्यांच्या गाड्या बघा. ते पाहून तुम्हाला लक्षात येईल की, आपल्या देशात संपत्तीची अजिबात कमी नाही. जर देशातील अब्जाधीश उद्योगपतींचे कर्ज माफ होऊ शकते. तर या गरिब शेतकऱ्यांचे कर्जही माफ झाले पाहिजे. हे सरकार उद्योगपतींचे कर्ज माफ करत आहे. मग शेतकऱ्यांचंही कर्ज माफ व्हायलाच पाहिजे. अन्यथा देशात कोणाचीही कर्जमाफी केली जाऊ नये, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले. (Loksabha Election)
Shetkari Bhavan | शेतकऱ्यांनो ही बातमी तुमच्या फायद्याची; वाचा सविस्तर
राहुल गांधी आणि अमित शाह आमनेसामने
दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया लवकरच पार पडणार असून, अमरावती लोकसभा मतदार संघाचाही यात समावेश आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे आज शेवटच्या दिवशी अमरावतीत सर्व पक्षांनी प्रचारासाठी आपली ताकद पणाला लावल्याचे दिसत आहे. दरम्यान, आज येथे मविआच्या उमेदवारासाठी राहुल गांधी आणि महायुतीच्या उमेदवारासाठी अमित शाह यांची जाहीर सभा होणार आहे. राहुल गांधींची सभा झाली असून, आता त्यांच्या या आश्वासन आणि आरोपांना अमित शाह काय प्रत्युत्तर देणार, हे बघावे लागणार आहे.