Rain Alert | शेतकऱ्यांनो काळजी घ्या; पुन्हा अवकाळीचा ‘अलर्ट’


Rain Alert | गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या अनेक भागात तापमानात घसरण होत असून डिसेंबरअखेरीस राज्यात दिवसेंदिवस थंडीचा जोर वाढत आहे. तर आता कडाक्याची थंडी पडलेली असताना काही भागांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हवामान विभागाने भारातातील अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवलेली असताना शेतकऱ्यांनी यापार्श्वभुमीवर काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात थंडीची जोर वाढत असून या कमी तापमानाचा फायदा रब्बी हंगामातील पिकांना होऊ शकतो असा अंदाज कृषी तज्ञांनी वर्तवलेला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत एकीकडे तापमानात घसरण होत असताना दुसरीकडे हवामान विभागाने भारतातील काही राज्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला असून यात तामिळनाडू, पुद्दूचेरी आणि कराईकल या भागांचा समावेश आहे.

Rain Alert | राज्यातील स्थिती काय असणार?

आता राज्यात हवेतील गारठा वाढत असून उत्तर महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी तापमानाचा पारा दहा अंशांखाली घसरला असून येत्या काही दिवसांत राज्याच्या किमान तापमानात आणखी घट होत या वर्षाअखेरपर्यंत ही थंडी कायमा असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ईशान्येकडील जोरदार वाऱ्यांच्या प्रभावामुळे डिसेंबरअखेर ते जानेवारी प्रारंभापर्यंत तामिळनाच्या किनारपट्टीवर हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तसेच पुढील ६ दिवस दक्षिण भारतातील काही भागात म्हणजेच तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल या भागात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार असून या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, 27 आणि 28 डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.