Farmers News | शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार! भारत सरकारने आखला मेगा प्लॅन


Farmers News | नवी दिल्ली : भारत हा कृषीप्रधान देश मानला जातो. दरम्यान, सध्या भारतात केंद्र तसेच राज्य सरकार शेती आधुनिकीकरणावर भर देत असून कृषी उत्पादकता आणि उत्पन्न वाढविण्यासाठी धोरणात्मक योजनांवर लक्ष केंद्रित केलं जात आहे. यातच देशातील योजनांचा एक भाग म्हणून भारत विशेष कृषी क्षेत्र निर्देशांक तयार करण्याचा विचार करत आहे.

भारतात कृषी तंत्रज्ञानाचे महत्त्व लक्षात घेत भारत सरकार शेतीसाठी अनेक योजना सुरू करत असून यातच एका नव्या योजनेची माहिती समोर येत आहे. देशातील योजनांचा एक भाग म्हणून भारत विशेष कृषी क्षेत्र निर्देशांक तयार करण्याचा विचार करत असून याच्या पूर्वतयारीचे काम नीती आयोगाच्या पातळीवर तसेच कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या पातळीवर सुरू झालेले आहे.

देशात नैसर्गिक शेतीकडे वाटचाल करत असताना देशासाठी एक शाश्वत अन्न व्यवस्था सुनिश्चित करणे तसेच शेती उत्पन्नात वाढ सुनिश्चित करणे ही या योजनेमागील कल्पना आहे. ज्यामुळे बाजारात शेती उत्पादनांची मागणी आणि उपभोग वाढवून ग्रामीण अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होऊ शकणार आहे.

Farmers News | शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी सरकार धोरणात्मक उपाय करणार

येत्या काही वर्षांमध्ये देशातील शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी सरकार धोरणात्मक उपाय करणार असून यात कमी पाणी लागणार्‍या पिकांकडे शेतकरी जाण्यासाठी अधिक प्रेरणा-जनजागृती तसेच शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील दुवा म्हणजे व्यापारी कमी करण्यासाठी पुरवठा साखळीत शेतकर्‍यांचे एकत्रीकरण करणे या सगळ्या उपाययोजनांचा समावेश आहे.

या योजनेवर काम करण्यासाठी सरकारने थिंक-टँक नीति आयोगाने संशोधन संस्था, शैक्षणिक संस्था आणि तज्ञांपर्यंत भारताच्या विकास उद्दिष्टांशी क्षेत्र आणि विशिष्ट धोरण फ्रेमवर्क करत सूचना मागविलेल्या आहेत. दरम्यान, अलीकडेच International Food Policy Research Institute (IFPRI) सोबत या आशयाच्या निवेदनावर सही करत पुढे जाण्यासाठी आणखी संस्था आणि व्यक्तींना जोडण्याची योजना आखलेली आहे.

(टिप- एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने ET ला दिलेल्या माहितीनुसार हे वृत्त असून ‘The Point Now’ याची जबाबदारी घेत नाही.)