Government | सरकार करतंय बफर स्टॉकमधून गहू-तांदळाची विक्री


Government | यंदा राज्यासह देशात अपेक्षित असा पाऊस न झाल्याने याचा परिणाम अनेक शेती उत्पादनावर झाला असून यावर्षी तांदुळ, गहु, भाजीपाला, फुले यासारख्या अनेक उत्पादनांची घट झाली आहे. अत्यल्प पाऊस झाला असल्याने या पिकांच्या पेऱ्यातही घट झाली त्याकारणाने सध्या बाजारात या उत्पादनांची आवक कमी झाली आहे.

तांदुळ आणि गहू हे भारतातील प्रमुख पिकं असून सध्या देशांतर्गत या उत्पादनांचा पुरवठा वाढविण्यासाठी आणि तांदुळ तसेच गव्हाच्या किरकोळ किमती नियंत्रित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारत सरकारने मोठ्या प्रमाणात देशातील ग्राहकांना ई-लिलावाद्वारे 3. 46 लाख टन गहू आणि 13,164 टन तांदूळ विकलेले आहेत.

Government | सरकार बफर स्टॉकमधून गहू-तांदूळाची करतंय विक्री

Open Market Sale Scheme (OMSS) म्हणजे अन्नधान्याचा पुरवठा वाढविण्यासाठी FCI वेळोवेळी खुल्या बाजारात ई-लिलावाद्वारे गहू आणि तांदळाच्या अतिरिक्त साठ्याची पूर्वनिर्धारित किंमतींवर विक्री करत असते. सध्या खुल्या बाजार विक्री योजना (OMSS) अंतर्गत किरकोळ किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार आपल्या बफर स्टॉकमधून गहू आणि तांदूळ विकत असून फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI), अन्नधान्य खरेदी आणि वितरणासाठी सरकारची नोडल एजन्सी, ई-लिलाव आयोजित करत आहे.

केंद्र सरकारने मार्च 2024 पर्यंत Open Market Sale Scheme (OMSS) साठी 101.5 लाख टन गव्हाचे वाटप केले असून 20 डिसेंबर रोजी 26 वे ई-लिलाव पार पडले ज्यामध्ये 4 लाख टन गहू आणि 1.93 लाख टन तांदूळ सादर करण्यात आले. तर ई-लिलावात 3.46 लाख टन गहू आणि 13,164 टन तांदूळ 2,178.24 रुपये प्रति भारित सरासरीने विकले गेले आहेत. तांदूळ, गहू आणि आट्याच्या किरकोळ किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत सरकार गहू आणि तांदूळ या दोन्हींचे ई-लिलाव साप्ताहिक स्वरुपात आयोजित करण्यात येत आहे.