Crop Theft | अन्नदात्यालाच लुटलं! राज्यात शेती पिकंही सुरक्षित नाही?


Crop Theft | सध्या राज्यातील शेतकऱ्यांना दुहेरी संकटांचा सामना करावा लागत असून पावसाळ्यातील झालेला अत्यल्प पाऊस त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात झालेला अवकाळी आणि गारपिटीना शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान केलं आहे. यातच वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील वाघोडा येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

शेतकऱ्याची प्रमुख मालमत्ता म्हणजे त्याने पिकवलेलं ‘पीक’. यातच वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात सात ते आठ अज्ञात दरोडेखोरांनी शेतकऱ्यावर चाकूने सपासप वार करत सोने आणि तब्बल ५५ पोतं सोयाबीन लंपास केली आहे. दरम्यान, कारंजा तालुक्यात गोपाल पालिवाल या शेतकऱ्याचे फार्म हाऊस असून तब्बल सात ते आठ दरोडेखोरांनी शेतकऱ्याला चाकूचा धाक दाखवत दरोडा टाकण्यात आला. यात ५५  पोतं सोयाबीन तसेच सोन्याचे दागिने याचा समावेश आहे.

याप्रकरणाची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी चव्हाण हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता शेतकऱ्यांच्या कष्टाची कमाई दरोडेखोरांनी लंपास केली होती. नेमका हा प्रकार का घडला? राज्यात शेतकरी सुरक्षित आहेत का? शेतकरीविरोधी धोरण असणारं सरकार यावर काही उपाययोजना करणार का? असे सवाल यामुळे उपस्थित होत आहेत.

Crop Theft | नेमका हा प्रकार घडला कसा?

गोपाल पालिवाल या शेतकऱ्याचे फार्म हाऊसवरून चोरी केलेला माल घेऊन पळून जात असताना अज्ञात दरोडेखोरांनी पालीवाल यांच्या गाडीतील हवा सोडली तसेच त्यांचे मोबाईलही सुद्धा हिसकावून घेतले. मात्र तातडीने पालिवाल कुटुंबाने हवा सोडलेल्या वाहनानेच पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांना पालिवाल कुटुंबाने त्यांच्यावर घडलेला संपुर्ण प्रसंग सांगितला. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत असून या घटनेमुळे संपुर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरलेले आहे.