Fodder | यावर्षी पावसाने सुरुवातीला हुलकावणी दिल्याने आधीच पिकांची लागवड कमी प्रमाणात झाली. त्यात जे पीक आले त्यांना अवकाळीचा तडाखा बसल्याने त्याचे नुकसान झाले. यासर्वांचा परिणाम राज्यातील पशू खाद्यावरही झाला असून, राज्यात अनेक ठिकाणी आता उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच चाऱ्याचा तुटवडा भासू लागला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर प्रशासनाने परजिल्ह्यात चाऱ्याची वाहतूक किंवा विक्री करण्यास सक्त मनाई केली असून, असे आढल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. (Fodder)
दरम्यान, बीड जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या पेरणी अहवालानुसार ३१ ऑगस्ट २०२३ रोजी १ लाख ८६ हजार मेट्रिक टन इतकाच चारा शिल्लक असून, तो आता अंदाजे केवळ पुढील ४३ दिवस पुरू शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील उपलब्ध चाऱ्याची स्थिती पाहता, पुढील काही दिवसांत चाऱ्याची भीषण टंचाई भासू शकते.
Farmer Protest | सरकारकडून आंदोलक शेतकऱ्यांना पहिली ऑफर
Fodder | शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाकडे पाठ फिरवली
दरम्यान, आष्टी तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रमुख व्यवसाय हा पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय हा आहे. मध्यंतरी दुधाचे दर खाली आल्याने पशुपालक शेतकरी अडचणीत सापडले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाकडे पाठ फिरवली होती. मात्र अद्यापही अनेक व्यावसायिक हे यावर ठाम असून, हे व्यावसायिक चाऱ्याची मागणी करीत आहेत. येथून पुढील काळात जोपर्यंत नवीन चाऱ्याचे उत्पादन होत नाही. तोपर्यंत चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता असून, आष्टी तालुक्यातील उत्पादन होणारा किंवा सध्या उपलब्ध असणारा वाळलेला आणि हिरवा चाऱ्याची जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यास स्थानिक प्रशासनाने मनाई केली आहे. (Fodder)
तसेच तालुक्यातच तुटवडा भासत असल्याने आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांना परजिल्ह्यात चारा वाहतूक करण्यास सक्त मनाई असून, उपलब्ध असणाऱ्या चाऱ्याची दुसऱ्या जिल्ह्यात विक्री करू नये असे निर्देश देण्यात आले आहेत.तरी चारा वाहतूक करताना आढळल्यास संबंधित व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती बीडीओ राजेंद्र गर्जे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात तब्बल १ लाख २७ हजार गोठी, तर १ लाख ५ हजार छोटी जनावरे सद्यस्थितीत आहेत.
Farmer News | वैतागलेल्या शेतकऱ्याने बँक मॅनेजरला चाकूने भोसकले
तालुक्यात ठिकठिकाणी चेक पोस्ट
आपल्याच तालुक्यात चारा टंचाई भासत असून, आपल्यालाच चारा मोठ्या प्रमाणात लागणार आहे. त्यामुळे तालुक्यातील कोणत्याही शेतकऱ्याने आपला चाऱ्याची परजिल्ह्यात विक्री करू नये. इतर जिल्ह्यात चाऱ्याची वाहतूक केली जाऊ नये, यासाठी तालुक्यात ठिकठिकाणी चेक पोस्ट तयार करण्यात आले आहेत. असे असतानाही जर कोणी चाऱ्याची वाहतूक करताना आढळून आले. तर त्या संबंधित व्यक्तीच्या विरोधात तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे सक्त निर्देश तालुका प्रशासनाने दिले आहेत. (Fodder)