Suicide | नाशकात शेतकऱ्याने संपवलं जीवन; सरकारचं टास्क फोर्स फक्त कागदावरच का?


Suicide | सध्या महाराष्ट्रातील शेतकरी दुहेरी संकंटांना सामोरे जावे लागत असून पहिले दुष्काळ आणि त्यानंतर अवकाळी आणि गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. यासर्व बाबींमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून यातच आता नाशिक मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.

शेतकऱ्यांना सध्या अनेक संकंटाचा सामना करत आपली उपजिविका करावी लागत आहे. या सगळ्या विवंचनेमुळे शेतकरी आत्महत्या आणखी वाढतात. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात एका शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असून आत्महत्या करताना या शेतकऱ्याने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. आता ती सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली असून आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहले आहे. मात्र या घटनेने नाशिक जिल्ह्यातील शेतकरी वर्गात खळबळ माजली आहे.

Suicide | ‘शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र’ मिशन नंतर टास्क फोर्सही फक्त कागदावरच?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शेतकऱ्यांसाठी ‘शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र’ मिशनची सुरुवात केली होती मात्र हे मिशन पुरते फेल ठरले आहे. यामागील कारण म्हणजे २०२३ या वर्षाच्या पहिल्या १० महिन्यात २४७८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टास्क फोर्स नेमणार असल्याचं जाहीर केलं होतं. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या हा अतिशय गंभीर विषय होत असून एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली तरी ती आत्महत्या दुख:द असते असं मुख्यमंत्री शिंदे हिवाळी अधिवेशनात म्हणाले होते.

असं असतानाही राज्यातील शेतकरी आजही अनेक संकंटामुळे मेटाकूटीला येऊन शेतकरी आत्महत्या करत आहेत. सरकारचं ‘शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र’ मिशन नंतर टास्क फोर्सही फक्त कागदावरच राहील का? असा सवाल उपस्थित होत आहे.