Farmers News | देशाच्या GDP मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा घसरला; केंद्र सरकारची धक्कादायक माहिती


Farmers News | भारत हा कृषीप्रधान देश असून भारतातील लोकसंख्येचा एक मोठा भाग हा कृषी क्षेत्रावर अवलंबून असल्यामुळे कृषी क्षेत्राला भारतात फार महत्त्व आहे. मात्र आता कृषी क्षेत्रासहीत संपुर्ण देशाला धक्का बसेल अशी माहीती समोर आलेली आहे. भारताच्या एकूण GDP मधील कृषी क्षेत्राचा वाटा घटला असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

भातातील शेती सध्या आधुनिक करण्यामागे केंद्राचा आणि राज्य सरकारचा जोर असून कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांना कमी श्रम करावे लागतील अशा तंत्रज्ञानाची ओळख सध्या करण्यात येत आहे. दरम्यान, भारताच्या एकूण GDP मधील कृषी क्षेत्राचा वाटा घटला असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली असून 1990-91 साली GDP मध्ये कृषी क्षेत्राचा 35 टक्के असलेला वाटा घसरुन गेल्या आर्थिक वर्षात तो थेट 15 टक्क्यांवर आला आहे.

Farmers News | कृषी क्षेत्राची झालेली घसरण ही या कारणांमुळे…

भारताच्या GDP मधील कृषी क्षेत्राची झालेली ही घसरण कृषी GVA मधील घसरणीमुळे झाली नसून देशातील औद्योगिक आणि सेवा क्षेत्रात झपाट्याने होत असलेल्या विस्तारामुळे झाली असल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्री अर्जुन मुंडा यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे मांडली आहे. सध्या भारतासह राज्यातील वातावरणात मोठा बदल होताना दिसत असून याचा परिणाम शेती पिकांवर मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे शेतीमधून येणाऱ्या उत्पन्नावर याचा परिणाम होऊ शकतो. दरम्यान, गेल्या पाच वर्षांत कृषी आणि कृषी निगडीत क्षेत्राची सरासरी वार्षिक 4 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे.

जागतिक अनुभवानुसार, जागतिक GDP मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा हा गेल्या दशकांमध्ये घसरल्याचं दिसून येत आहे. हा घसरता आलेख पाहता देशातील शेतकऱ्यांसाठी विविध विकासात्मक कार्यक्रम, शेतकऱ्यांचे उत्पन्न सुनिश्चित करण्यासाठी योजना, शेतीतील सुधारणा आणि धोरणे अंमलबजावणी केलेली असल्याचे कृषीमंत्री कृषीमंत्री अर्जुन मुंडा म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना कृषीमंत्री अर्जुन मुंडा म्हणाले की, देशात 2019 मध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली असून ही एक शेतकरी उत्पन्न समर्थन योजना आहे. जी तीन समान हप्त्यांमध्ये प्रति वर्ष शेतकऱ्यांना 6,000 रुपये उत्पन्न प्रदान करते. तसेच देशातील 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 2.81 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम या योजनेमार्फत जारी करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्री अर्जुन मुंडा यांनी दिली.